भंडारा : भंडारा (Bhandara District Jail)  जिल्हा कारागृहात एक कैदी आत्महत्या (Prisoner Suicide) करण्यासाठी झाडावर चढला होता.  पोलिसांनी (Bhandara Police) तब्बल दीड तासानंतर त्याला खाली उतरविण्यात यश मिळवलं. दीपक हेमराज सयाम (20 , रा. पलखेडा ता. गोरेगाव, जि. गोंदिया)  असं या कैद्याचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कैदी 1 जुलै 2017 पासून भंडारा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. गोंदिया न्यायालयातील (Gondia Court) एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, मध्यप्रदेशातील बिलासपूर येथील चोरी प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला बिलासपूर कारागृहात पाठविले जाणार होते. त्यासाठी तो पोलीस गार्डची मागणी करत होता. दरम्यान, सायंकाळी दैनंदिन दिनचर्येकरता  कैद्यांना कारागृहातील आवारात आणले. त्यावेळी कारागृहातील पिंपळाच्या झाडावर दीपक सर्वांची नजर चुकवून चढला व जोरजोराने ओरडू लागला. जोपर्यंत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कारागृहात भेटायला येणार नाही, मला बिलासपूरच्या केंद्रीय जेलमध्ये कायमस्वरूपी वर्ग करण्यासाठी पोलीस गार्ड मिळणार नाही, तोपर्यंत मी झाडावरच राहणार, अन्यथा मी झाडावरून उडी मारून आत्महत्या करणार, अशी धमकी देत होता. 


हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच कारागृह अधीक्षक यांच्यासह कारागृह कर्मचारी तेथे पोहोचले. तसेच भंडारा शहर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर तो झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसून तेथून खाली उतरला. झाडावर चढून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या न्यायालयीन बंदी दीपक सयाम याला पोलीस गार्डच्या मदतीने बिलासपूरकडे रवाना करण्यात आले आहे. मात्र, झाडावर चढून त्याने आत्महत्येचा इशारा दिल्याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये (Bhanara Police Station)  कलम 309 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :