Snake in House : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा येथे एका घरात तब्बल 12 नाग (Indian Cobra) सापडले. विशाल कावळे यांच्या राहत्या घरी नाग जातीचे 11 पिल्ले आणि एक मादी साप (Snake) पकडण्यात सर्प मित्रांना यश आले आहे. हे दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. परंतु एकाच वेळी तब्बल बारा नाग आढळल्याने थरकाप उडाला असून भीतीचं वातावरण आहे.
सर्वप्रथम दीड फूट लांबीचे तीन नागांची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर तातडीने तुमसर येथील सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या शोधमोहिमेत दीड फूट लांबीचे 11 पिल्ले आणि पाच फूट लांबीची मादीला पकडण्यात यश आलं आहे. ही पिल्ले जवळपास तीन दिवसांची असावीत असं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. हे सर्व नाग जातीचे विषारी साप असून यात न्यूरोटॉक्झिम विष असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले आहे.
दरम्यान या मादी नागाने स्वयंपाक घरात एक खोलगट खड्डा केला असून यात अंडी दिल्याचे भाकित वर्तवलं जात आहे. या मादीने जवळपास 30 ते 35 अंडी घालण्याची शक्यता असून पिल्लांची संख्या जास्त असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व नागांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं आहे.
सांगलीत नऊ महिन्यांपूर्वी सापाने घेतला होता बहिण भावाचा बळी
सांगलीतील खानापूर तालुक्यातील आळसंद गावात नऊ महिन्यांपूर्वी भाऊ-बहिणीसाठी घरात घुसलेला मण्यार जातीचा साप काळ बनून आला. मण्यार जातीच्या सापाने बहिण आणि भावाचा जीव घेतला. भावाला विषारी मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यानंतर त्याच सापाने दुसऱ्या दिवशी बहिणीलाही दंश केला. यात भावाचा लगेचच अंत झाला पण यात उपचार घेत असताना बहिणीचाही मृत्यू झाला. विराज कदम (वय 16 वर्षे) आणि सायली जाधव (वय 23 वर्षे) अशी दोघांची नावं होती.
इतर बातम्या