Bhandara : भंडारा शहरात आज धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील बाबा मस्तानशहा वार्डात असलेल्या हनुमान मंदिर परिसरात वार्डातील नागरिकांनी शारदा मातेची स्थापना केली आहे. या ठिकाणी आज महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होते. तिथे महाप्रसाद तयार करण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी 40 किलो वजनाच्या कुकरमध्ये महाप्रसादासाठी डाळ लावली होती. यावेळी कुकर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यात स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये तिथे असलेले 12 पेक्षा अधिक जण वाफाळलेली डाळ अंगावर पडल्यानं जखमी झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जखमी झालेल्या सर्वांना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं
दरम्यान, जखमी झालेल्या सर्वांना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील सहा गंभीर जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून उर्वरित किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलं आहे. खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सकांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! एकाच वेळी 200 सिलेंडरचा स्फोट, 10 किलोमीटरपर्यंत आवाज, एकाचा जागीच मृत्यू