Bhandara News : पुढच्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागले आहेत. शक्य आहे त्या ठिकाणी एकत्र, शक्य नाही तिथे एकला चलो ची भूमिका घेणार असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भंडाऱ्यात भाजपने शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबर धक्का दिला आहे.
एबीपी माझाचं भाकित ठरलं खरं
राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपनंचं भंडाऱ्यात जबर धक्का दिलाय. शिंदेंच्या युवा शिवसेनेचे भंडारा-गोंदिया लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर या दोघांनी आज भाजपात प्रवेश केलाय. शिंदे सेनेचे जॅकी रावलानी हे भाजपच्या वाटेवर ही बातमी एबीपी माझानं आज सकाळी दाखविली आणि ते भाकीत खरं ठरलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश नागपुरात पार पडला. जॅकी रावलानी हे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार भोंडेकर यांच्या विजयात जॅकी रावलानी यांचा मोठा वाटा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रावलानी यांच्या भाजपा प्रवेशने शिंदेंच्या शिवसेनेसह आमदार भोंडेकरांना हा जबर धक्का मानला जातोय.
महत्वाच्या बातम्या: