Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातील साकोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 19 वर्षीय नर्सिंगच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात तिने स्पष्ट केलं आहे की, “मी स्वतः आत्महत्या करतेय, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.” ही घटना भंडाऱ्याच्या साकोली येथील पंचशील वार्डात घडली.
मामाच्या गावात नर्सिंग शिकणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीची गळ्याला दोरी
मृत नर्सिंग विद्यार्थिनीचं नाव प्रेरणा खोब्रागडे (१९) असं आहे. ती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पंचवटी गावची रहिवासी असून सध्या साकोली येथील मामाकडे राहून नर्सिंग महाविद्यालयात प्रशिक्षण घेत होती. तिने गळफास घेऊन आयुष्य संपविल्यानं कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी असताना केलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुसाईड नोटमध्ये मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका असं नमूद करण्यात आलं असलं तरी, तिने आत्महत्येसारखी टोकाची पावलं का उचलली यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबईत पावसाचा हाहाकार, वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू
दुसरीकडे, मुंबईतील भांडूपमध्ये रस्त्यावरती खुले असलेल्या विजेच्या तारांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. मृत्यू झालेल्याचे नाव दीपक पिल्ले असून तो फक्त 17 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. त्याने कानात हेडफोन घातले होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी केलेले इशारे त्याला ऐकू आले नाहीत. रस्त्यावर महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती, आणि त्याच्याशी संपर्कात येताच विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रस्त्यातून अनेक लोक जात होते, आम्ही त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दीपककडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण कानात हेडफोन असल्यामुळे तो ऐकू शकला नाही. आम्ही मागे धावत गेले, पण तो आधीच वायरच्या संपर्कात आला होता आणि खाली पडला,” असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा -