भंडारा : भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज (24 जानेवारीला) साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आले आहे. या दुर्घटनेत काही कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र ऑर्डनन्स फॅक्टरीकडून (Ordnance Factory) मृतांचा आकडा नेमका किती या अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नसताना दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर सध्या घटनास्थळावर पोलीस अधीक्षक, एनडीआरएफ(NDRF), एसडीआरएफ(SDRF) पथक पोहोचला आहे. सकाळी ज्या पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यातील एका कामगाराचा मृत्यू तर, अन्य एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याचे समजतंय. मात्र या दुर्घटनेत (Bhandara Ordnance Factory Blast) आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर एलटीपी प्लांटच्या बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. सोबतच बिल्डिंगच्या काही स्लॅबच्या भागाचेही तुकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटात दूरवर फेकल्या गेलेत. ज्या ग्रामस्थांनी हा स्फोट अनुभवला त्यांनी या बाबत माहिती देत हा सगळा थरारक अनुभव सांगितला आहे.
दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढला
पुढे आलेल्या माहितीनुसार या स्फोटातील दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या इमारतीत एकूण 14 कामगार काम करीत असल्याची ही माहिती आहे. त्यातील पाच कामगार गंभीर जखमी असून या कामगारांना उपचारासाठी भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सात कामगार मलब्याखाली दबून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी युद्धस्तरावर काम करीत आहे.
दरम्यान, स्फोटामध्ये जखमी झालेल्या सहा लोकांना भंडाराच्या लक्ष रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित पाच जखमींवर उपचार सुरू आहे. तर ब्लास्ट झालेल्या इमारतीच्या मलब्याखाली सहा ते सात कामगार दबून असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव :
१) चंद्रशेखर गोस्वामी
उपचार सुरू असलेल्या जखमींची नाव
१) राजेश बडवाई
२) संजय राऊत
३) नरेंद्र वंजारी
४)सुनील यादव
५) नाव कळालेल नाही....
हे ही वाचा