Pushpa 2 OTT Release: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून चौथ्या आठवड्यापर्यंत बॉक्स ऑफिसवरील (Box Office) सर्व रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील 'दंगल' नंतरचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. अशा परिस्थितीत, आता हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ओटीटी रिलीजसाठी चाहते आणि प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सर्वांच्या लाडक्या पुष्पाभाऊचा जलवा ओटीटीवर कधी आणि कुठे पाहायला मिळणार? जाणून घेऊयात सविस्तर...
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं की, तो 56 दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही. निर्मात्यांनी प्रेक्षकांना ओटीटीसाठी जास्त वेळ वाट पाहण्यास सांगितलं होतं. अशा परिस्थितीत, आता ती वाट संपणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. जानेवारी 2025 च्या अखेरीस हा चित्रपट 56 दिवस पूर्ण करेल, त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
Stream genx च्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, अल्लू अर्जुन स्टारर फिल्म 'पुष्पा 2' ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रिम केली जाणार आहे. binged.com वर दिलेल्या अपडेटनुसार, फिल्मची स्ट्रिमिंग डेट 30 जानेवारी 2025 असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, फिल्मच्या ओटीटी रिलीजबाबत मेकर्सच्या वतीनं अद्याप कोणतंच ऑफिशिअल स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाही आणि ना याच्या ओटीटी स्ट्रिमिंगच्या डेटचा खुलासा करण्यात आला आहे. असं म्हटलं जात आहे की, 56 दिवस पूर्ण झाल्यानंतर, जानेवारीच्या अखेरीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशई हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.
'पुष्पा 2'ची 1800 कोटींहून अधिक कमाई
'पुष्पा 2' च्या बॉक्स ऑफिस रिपोर्टबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटानं 29 व्या दिवशी जगभरात 1799 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यानंतर चित्रपटाची जगभरातील कमाई 1800 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तसेच, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, त्याच्या भारतातील कलेक्शननं 1199 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटानं हिंदीमध्ये 785.65 कोटी रुपये कमावले आहेत. अशा परिस्थितीत, आता ओटीटीवर प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :