Bhandara News भंडाराभंडारा जिल्हा (Bhandara) कारागृहातील एका बंदीवानाने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोबतच या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Bhandara Police) शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात (Bhandara News) मोठी खळबळ उडाली आहे. शाम उर्फ पिटी चाचेरे (35) असे या हल्लेखोर बंदीवानाचे नाव आहे.


कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला


जिल्हा कारागृह वर्ग 1 येथे महिला रक्षक ही न्यायाधीन बंदीवानांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखती घेत असताना न्यायाधीन बंदी शाम उर्फ पिटी चाचेरे याची व्हिडीओ कॉन्फरन्सींग मुलाखतीची वेळ संपत आली होती. त्यामुळे महिला रक्षकाने त्याला पाच मिनीट शिल्लक राहिले असे बोलले असता आरोपीने कर्तव्यावरील महिला रक्षकासोबत शाब्दीक वाद घातला. त्यानंतर त्याची मुलाखतीची वेळ पूर्ण झाल्याने महिला रक्षकाने व्हिडीओ कॉल बंद केला. त्यावर आरोपी बंदीने राग व्यक्त करत कर्तव्यावरील महिला रक्षकाच्या अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांना शिविगाळ करुन हाताला झटका देऊन शासकीय कामात अडथडा निर्माण केला. तेव्हा महिला रक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरवर्तन केल्याची माहिती दिली. 


भंडारा पोलीसात गुन्हा दाखल


माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी हे मुलाखती कक्षात आले असता आरोपी बंदीवानाने वरिष्ठ अधिकारी संतोष क्षीरसागर आणि गुलाब खरडे यांना तुम्ही मला बोलू देत नाहीत, असे बोलून अश्लिल शिविगाळ केली. तसेच गुलाब खरडे यांना टिप्परद्वारे जीवाने ठार मारण्याची देखील धमकी दिली. पोलिसांनी दाखल तक्रारीवरुन आरोपी बंदीवाना विरुद्ध भंडारा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहे.


भंडारा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमणावर चालला बुलडोझर


वरठी येथील भंडारा रोड रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेवर मागील 10 वर्षांपासून रोजगारासाठी अनेकांनी अतिक्रमण करून त्यांची दुकानं थाटली होती. मात्र, यामुळं रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्यानं, या मार्गावरील अतिक्रमण आज हटविण्यात आले आहे. मोहाडी तहसीलदार, वरठी ठाणेदार यांच्या पुढाकारातून पोलिसांच्या बंदोबस्तात या अतिक्रमणावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात काही वेळ तनावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी ही कारवाई करत या परिसरातील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या