बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. केज तालुक्यातील मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या सीआयडी कोठडीत आहे. यादरम्यान त्याच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम कराडच्या डोळे तपासणीसाठी गेली होती. यावेळी त्याचे डोळे तपासून औषधोपचार आणि ड्रॉप देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडची (Walmik Karad) झोप पूर्ण होत नसल्याने डोळ्यांना संसर्ग झाल्याची डॉक्टरांनी सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) 14 दिवसाच्या सीआयडी कोठडीमध्ये आहे.


 सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी


वाल्मिक कराड (Walmik Karad)याने काही दिवसांपुर्वी न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला होता. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली होती, मात्र न्यायालयाने वाल्मिक कराडची ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता त्याला डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. 


वाल्मिक कराडवरील गुन्ह्यासंदर्भात मोठी माहिती समोर 


वाल्मिक कराड याच्यावरील गुन्ह्याची आकडेवारी समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत, 8 गुन्ह्यात निर्दोष मुक्तता मिळाली आहे, तर खंडणीसह 4 प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. एकीकडे वाल्मिक कराड यांच्यावर 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 15 पैकी 8 गुन्ह्यात कराड यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. 


या गुन्ह्यात झालीय निर्दोष मुक्तता 


1) परळी शहर पोलिस ठाण्यात 1999 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


2) परळी शहर पोलिस ठाण्यात 2001 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


3) परळी शहर पोलिस ठाण्यात 2001 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


4) परळी शहर पोलिस ठाण्यात 2002 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


5) परळी शहर पोलिस ठाण्यात 2006 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


6) परळी शहर पोलिस ठाण्यात 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


7) अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात 2002 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


8) दिंद्रुड पोलिस ठाण्यात 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.


- बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019 ला दाखल गुन्ह्यात आरोपी विरुद्ध पुरावा न मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल नाही.


- बर्दापूर पोलीस ठाण्यात 2015 ला दाखल गुन्ह्यात दोषारोपामधून मुक्तता.


- परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 ला दाखल गुन्ह्यात नाव कमी करण्यात आले आहे.


- तर खंडणी प्रकरणासह अन्य 3 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.