Beed News : बीडच्या परळीतील बहुचर्चित जवाहर शिक्षणसंस्थेच्या 32 जागांसाठी आज मतदान होत आहे. भाजप नेत्या आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अशी ही निवडणूक रंगणार असल्याने या निवडणुकीला अधिकच महत्व आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. मात्र असे असलं तरीही सत्ता कोणाच्या हातात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार असून, संपूर्ण बीड जिल्ह्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागले आहेत. 


परळीतील बहुचर्चित जवाहर शिक्षणसंस्थेच्या एकूण 34 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याने आता 32 जागांसाठी निवडूक होत आहेत. तर यासाठी एकूण 1221 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 


तब्बल 16 वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे...


परळी शहरातील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली आहे. तर पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेले वैजनाथ महाविद्यालय ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. पण एका न्यायालयीन प्रक्रियेमुळे या महाविद्यालयाचे निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र आता तब्बल सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच न्यायालयाच्या आदेशाने आज प्रत्यक्ष निवडणूक होत असून, मतदान प्रकिया पार पडत आहे. तर या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोघांचे पॅनल या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. तर यापूर्वीच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आता मतमोजणीनंतरच हे महाविद्यालय कोणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होणार आहे. 


प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप...


जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना दोन्ही मुंडे बहीण-भावात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. “समोरचा पॅनल फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा राहिला आहे. कदाचित एक उमेदवार बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रमच उरकला असता,” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिले होते. "या निवडणुकीत मी उभी राहिले असून, माझ्या समोरचे उभे राहिले आहेत. त्यामुळे जे कोणी उभं राहिल, प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण कॉलेज चालवणं सोपं नाही,"असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उत्तर दिले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : मनोमिलनाला महिना उलटत नाही तो पुन्हा मुंडे भाऊ-बहीण आमनेसामने