Beed News : आई-वडिलांना देवासमान मानले पाहिजे असं अनेक थोर लोक सांगतात. मात्र आईच्या मृत्यूनंतर चक्क आईचं मंदिर साकारण्याचं काम बीडच्या (Beed) सावरगाव येथील तीन भावांनी केलं आहे. आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात यासाठी सावरगाव गावच्या खाडे वस्तीवरील तीन भावंडांनी चक्क आपल्या आईचं भव्य असं मंदिर उभं केलं आहे. तसेच याच मंदिरात आईची मूर्ती बसवण्यासाठी भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राजेंद्र खाडे, विष्णू खाडे आणि छगन खाडे असे या तिन्ही भावांची नावे आहेत. 


बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील राधाबाई खाडे आपल्या तीन मुलांना मोठ्या मेहनतीतून लहानाच मोठं केलं. जेमतेम शिक्षण शिकवलं. मात्र, वर्षभरापूर्वी राधाबाई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या अचानकपणे जाण्याने तिन्ही भावांवर दुःखाचे डोंगर कोसळले. आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात यासाठी या तिन्ही भावांनी तिचा मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला. यसाठी त्यांनी घराच्या अंगणात हे मंदिर उभारल. 


एक वर्षांपूर्वी राधाबाई खाडे यांचे निधन झालं. मात्र संपूर्ण हयातीत त्यांनी मोठ्या हिमतीने तीन मुलांसह आपल्या संसाराचा गाडा मोठ्या नेटाने चालवला. त्यामुळे मृत्यूनंतर आपल्या आईचं एक मंदिर बांधण्याचा पण या मुलांनी घेतला. पुण्याच्या मूर्तीकाराकडून आईची सुंदर अशी मूर्ती तयार करून घेतली आणि तब्बल दहा लाख रुपये खर्च करून या मंदिराची उभारणी त्यांनी केली आहे. तसं सावरगाव घाट हे गाव राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी आहे. या गावात अनेक देवदेवतांची मंदिर आहेत. मात्र खाडे कुटुंबीयांनी आपली आईच आपल्यासाठी सर्वस्व मानून मृत्यूनंतरही तिचा विसर पडू नये म्हणून हे एका वर्षातच मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. विशेष म्हणजे त्यांनी हा पण पूर्ण करून दाखवला.


दोन दिवसांमध्ये मूर्ती मंदिरात बसवणार...


गेल्यावर्षी 18 मे 2022 रोजी राधाबाई खाडे यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलांनी राजेंद्र, विष्णू व छगन यांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचे मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण करायचा असा निश्चय केला होता. त्यानुसार आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून, येत्या दोन दिवसांमध्ये या मूर्ती मंदिरात बसवली जाणार आहे. अशा प्रकारचे आपल्या स्वतःच्या आईचे या पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य मंदीर असणार आहे.


अशी बनवली मूर्ती...


दिवंगत आईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय तिन्ही भावांनी केला. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत. तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले. दहा बाय 13 च्या जागेत या मंदिराचे उभारणीचे काम सुरू झाले. सहा महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले. मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ते देखील ही मूर्ती बनवण्यास तयार झाले. तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून त्यांनी अतिशय आकर्षक व भक्ताक्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली असून, या मंदिरासाठी व मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल नऊ लाख रुपये खर्च आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Exclusive : आईचं कॅन्सरने निधन, दुसऱ्याच दिवशी मैदानात, कल्याणमध्ये वाढला, आता धोनीचा प्रमुख शिलेदार; तुषार देशपांडेची धगधगती कहाणी