बीड : महाराष्ट्रात सरकार नाही तर गुजरात्यांचे मुनीम बसले असल्याची टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी काढलेली मातृ तीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बीड (Beed) जिल्ह्यातील पोहोचली आहे. बीडमधील पिंपळनेरमध्ये सुषमा अंधारे यांच्या यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आले. तर, अंधारे यांच्या हस्ते पिंपळनेर येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीची आरती देखील करण्यात आली. यावेळी सुषमा अंधारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. याचवेळी बोलतांनी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 


यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्यात की, "राज्यामध्ये एकापाठोपाठ एक गोळीबाळासारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तर, पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला याचा निषेध करत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला करणार आहे असं सांगून देखील पोलिसांनी हा सर्व प्रकार रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या. दुसरीकडे गृहमंत्रालयच गुन्हेगारी वाढवत आहे. राज्यामध्ये गोळीबार, दंगली घडत असून, त्या सरकार पुरस्कृत असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. 


भाजपवर जोरदार टीका...


पिंपळनेर येथे शेतकऱ्यांची संवाद करत असताना सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. मोदी यांची गॅरंटी म्हणजे लोकांना चुना लावणं आहे. शेतकऱ्यांसाठी पाशा पटेल यांनी यात्रा काढली होती, या यात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला 12 हजार रुपये भाव द्या अशी मागणी करण्यात आली होती. आता ही मागणी करणारे नेते कुठे गेले असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केला. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांसाठी ऊसतोड कल्याण महामंडळ करण्यात आला आहे. मात्र, असं महामंडळ असल्याचं ऊसतोड मजुरांनाच माहीत नाही त्याचा फायदा देखील कोणाला झाला नसल्याच सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 


यात्रेचं जंगी स्वागत


शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काढलेली मातृ तीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा बीड जिल्ह्यातील पोहोचली आहे. बीड मधील पिंपळनेरमध्ये सुषमा अंधारे यांच्या यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांची ही मातृ तीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा गावागावात जाणार आहेत. तसेच आपल्या प्रत्येक यात्रेतून अंधारे सरकारवर हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


 Kalyan Lok Sabha constituency : मुलूखमैदानी तोफ सुषमा अंधारे थेट श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमध्ये ठाकरेंची 'मशाल' पेटवणार?