Satish Bhosale : भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई याने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर त्याचे नवनवीन कारनामे दररोज उघडकीस येत आहेत. तर सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वनविभागाने छापा टाकला आहे. यात वनविभागाला वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 
  
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप असून या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केल्याचा आरोप करण्यात आला होता. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेला डोंगर, या डोंगरांमध्ये हरीण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते. मात्र, त्याच हरणांना पकडण्यासाठी त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती. या गँगला ही जाळी लावू नका म्हणून मज्जाव केल्यानंतर तशी सूचना करणाऱ्यांनाच मारहाण करण्यात आली होती. 


खोक्या भाईच्या घरी सापडलं शिकारीचं घबाड


याबाबत वनविभागाने दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहे.  धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या आहेत. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले आहे. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ याच्या मार्गदर्शनाखाली 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली होती. दरम्यान, वनविभागाला उशिरा जाग आल्याने वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. 


कोण आहे सतीश भोसले? 


सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. 



आणखी वाचा 


Satish Bhosale : 'अण्णा तुम्ही कुठल्याही पक्षात जा अन् मुख्यमंत्री व्हा...', फरार सतीश भोसले उर्फ खोक्याभाईचा Video व्हायरल