Santosh Deshmukh Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे. हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले आहे.


प्रतीक घुले (Pratik Ghule) व सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची गावात व परिसरात मोठे दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची सांगण्यावर खंडणी गोळा करायचे काम करत होते, असं एका गोपनीय साक्षीदाराने म्हटलं आहे. 


गोपनीय साक्षीदाराने आपल्या जबाबात काय म्हटलंय?


आमचे गावात राहणारे सुदर्शन घुले, प्रतिक घुले व सुधीर सांगळे यांना मी ओळखतो. प्रतिक घुले हा रिक्षा चालवत असे तर सुधीर सांगळे याचे हॉटेल गंगमाऊली साखर कारखाना याठिकाणी होते. सुदर्शन घुले हा साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करत असे. प्रतिक घुले व सुधीर सांगळे हे दोघे नुदर्शन घुले यास भाऊ मानत होते. ते त्याला भावा म्हणूनच बोलवायचे. तिघांची गावात व परिसरात मोठी दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराड याचे सांगण्यावरुन खंडणी गोळा करण्याचे काम करतात. माझा वरील जबाब संगणकावर टाईप करण्यात आला असून तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.


वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले, त्यामध्ये त्यांच्याच टोळीतील लोक-


संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसऱ्या एका गोपनीय साक्षीदाराने जबाबात म्हटलं की,वाल्मिक कराड यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या आहे. याच टोळ्याच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली. तर कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो. दहशतीमुळे वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले हे त्यांच्याच टोळीतील लोक होते.


संबंधित बातमी:


Santosh Deshmukh Case: आरोपींनी हाल हाल करुन मारलं, संतोष देशमुखांनी शेवटचं एकच सांगितलं, म्हणाले...