Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची सीआडीकडून बीडमध्ये चौकशी करण्यात आलीये. संध्या सोनवणे यांची दुपारपासून सुरु असलेली चौकशी आता संपली आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून चौकशी करण्यात आली. सोनवणे यांच्यासह अन्य काही लोकांची चौकशी असल्याने वेळ लागल्याची सोनवणे यांनी माहिती दिलीये. दरम्यान, चौकशी झाल्यानंतर संध्या सोनवणे माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान, राजकारणात असल्याने सर्वांशी संबंध येतात, पण वरिष्ठांवर होत असलेल्या आरोपांबाबत भाष्य करणार नाही, असं संध्या सोनवणे यांनी म्हटलंय. 


वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत, त्याविषयी मी काहीही बोलणार नाही : संध्या सोनवणे 


संध्या सोनवणे म्हणाल्या, जे जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली. मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं. बारा वाजता मी आले होते. जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवेल त्यावेळेस मी चौकशीला हजर राहणार आहे. राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येतात. वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. पहिल्यांदाच अशा पद्धतीने चौकशीला मी सामोरे गेले. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी 


संध्या सोनावणे यांची दुपारपासून सुरु असलेली चौकशी आता संपली


बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून सुरु होती चोकशी


सोनावणे यांच्यासह अन्य काही लोकांची चौकशी असल्याने वेळ लागल्याची सोनावणे यांची माहिती


जे जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली


मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं


बारा वाजता मी आले होते


जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवेल त्यावेळेस मी चौकशीला हजर राहणार


राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येतात


वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही


पहिल्यांदाच अशा पद्धतीने चौकशीला मी सामोरे गेले.






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Santosh Deshmukh Murder Case : आरोपींचे ठसे जुळले, बँक खाते गोठवले; वाल्मिक कराडच्या पासपोर्टबाबत मोठी माहिती; सीआयडीच्या तपासात 5 मोठे खुलासे


Vijay Wadettiwar : दहा-दहा बायका करा, पण कोणाचा खून करु नका; धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य; चित्रा वाघ यांच्यावरही सडकून टीका