बीड : बीडमध्ये (Beed) महायुतीच्या मेळाव्याचं (Mahayuti Melava) आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बॅनरवरुन भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटोच नव्हता. त्यामुळे प्रीतम मुंडे (Pritam Munde) या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या. तसेच यापुढे असं चालणार नाही, असा इशारा देखील यावेळी प्रीतम मुंडे यांनी दिला. त्यामुळे बीडच्या महायुतीच्या मेळाव्यात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. 


दरम्यान या पुढे बीडच्या खासदार या प्रीतम मुंडे असतील असं देखील प्रीतम मुंडे यांनी जाहीर केलं. त्यामुळे बीडमधील लोकसभा मतदारसंघाचा नवा चेहरा पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. राज्यभरात रविवार 14 जानेवारी रोजी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याच मेळाव्याचं बीडमध्ये देखील आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी प्रीतम मुंडे बोलत होत्या. 


धनंजय मुंडेंचा देखील पाठिंबा


दरम्यान या मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, प्रीतम मुंडेंना विजयी करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काय होणार हे कुणाला विचारायची गरज नाही. कारण महायुतीच्या ताईच विजयी होणार. म्हणून सगळा भार बहिणीच्या खांद्यावर घेतलाय. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना बीडच्या लोकसभा मतदारसंघासाठी प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जातंय. 


सांगलीत सदाभाऊ खोतांनी व्यक्त केली खदखद


या कार्यक्रमला माजी आमदार सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या. सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या.  घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे. 


हेही वाचा : 


Shivajirao Adhalarao Patil : मी लढणार, निवडणुकीला उभं राहणार आणि निवडूनही येणार, शिरुर मतदारसंघात आढळराव पाटलांचे आव्हान