Manoj Jarange On Chhagan Bhujbal : बीडच्या (Beed) ओबीसी महाएल्गार सभेमधून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उत्तर दिले आहे. जाळपोळीच्या घटनांचे नंबर छगन भुजबळ यांना माहीत कसे, दोनशे पिस्टल आणले ते त्यांनां माहीत कसे, त्यामुळे भुजबळांना मंत्री पदावरून हटवून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. याचवेळी भुजबळ येडे, बधीर झालेत असेही जरांगे म्हणाले.
जालना आणि बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात 200 पिस्तूल आल्या आहेत, असा दावा छगन भुजबळांनी केला होता. यावरून जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. "पिस्तुलाची भाषा बोलवून भुजबळ मराठा आंदोलकांना बदनाम करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी अन्यथा ते टारगेटवर असतील. भुजबळ लईच येडे आहे, कधी शहाणे होईल काय माहिती. मराठे ओबीसीमध्ये गेले आहेत. कुणबी प्रमाणपत्राला चॅलेंज होत नाही. भुजबळ यांना कशाला सरकार बदनाम करण्यासाठी घेतले कळतच नाही. छगन भुजबळ खरोखरच बधीर झालेले आहेत, त्यांच्या नादी लागायचं नाही. पुढच्या वेळेस भुजबळ यांना मंत्रीपद मिळणार नाही, त्यामुळेच ते मंत्रिपदाची गरज नाही असं म्हणतात, असे जरांगे म्हणाले.
भुजबळांना गोरगरिबांच्या जीवावर मंत्रीपद मिळाला
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "भुजबळ गरिबावर अन्याय करण्यासाठी मंत्री पदाचा वापर करत आहेत. कायदा पायदळी तुडवत आहे. दंगली घडवण्याची भाषा बोलली जात आहे. नोटीसला आम्ही घाबरत नाही, आम्ही मुंबईला जाताना गनिमी कावा करणार आहोत. तोंड दिले म्हणून भुजबळानेही काहीही बोलायचं का? गोरगरिबांच्या जीवावर मंत्रीपद मिळाला. ओबिसीच्या मुंडक्यावर पाय देऊ नये," असे जरांगे म्हणाले.
भुजबळांच्या पापाचे फळ त्यांच्या लेकरांना भोगाव लागत आहे...
भुजबळ यांनी पिस्तूल विकायचा धंदा टाकला का? बीडमधील जाळपोळीचे नंबरची यांच्याकडे कशी माहित आली. कायदेशीर पदावर हटवून चौकशी केली पाहिजे. भुजबळ यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्याचा परिणाम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोगावा लागु शकतो. आंदोलन आता मॅनेजमेंटच्या पुढे गेले आहे. भुजबळांनी केलेल्या पापांच फळ त्यांच्या लेकरांना भोगाव लागत आहे. सगळ्यांच खाल्ले त्यामुळे त्यांच्या लेकरांवर ही वेळ आली. त्यांनी स्वतःचा कुटुंब सुद्धा सोडले नाही. त्यामुळे ते ओबीसीला काय सोडणार, असे जरांगे म्हणाले.
अजित पवारांवर टीका...
कोणीही मराठयांच्या विरोधात जावू नयेत. पाच महिने अजित पवारांच्या विरोधात आम्ही बोललो नाही. मात्र, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर मराठा असला तरी सोडणार नाही. कारवाईची भाषा केल्यापासून जास्त ताकदीने मराठे मुंबईकडे रवाना झाले.
मला नेता वगैरे व्हायचं नाही
मराठ्यांचा गनिमी कावा कसा असतो हे मुंबईत पहा, त्यांनी कितीही 144 लावले तरी मराठा समाज मुंबईमध्ये येणारच. आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या लोकांना बदनाम करणारे कोण आहेत हे शोधून काढणार आहे. मला नेता वगैरे व्हायचं नाही, मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मी काही करणार नाही. मी डोंगरात जाईल किंवा हिमालयात जाईल. आरक्षण देतांना हटणार नाही, कोणाला वळवळ ही करू देणार नाही, असे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: