बीड: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी राज्यभर साखळी आंदोलनं सुरू आहे. दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यातल्या मैंदा गावात देखील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर, गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केल आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस असून, जीव धोक्यात घालून आंदोलनकर्ते दररोज या पाण्याच्या टाकीवर चढत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन उभं केलं. या आंदोलनाचे लोन आता राज्यभर पोहोचत आहे. त्यातच वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी करण्यात येत आहे. बीडच्या मैदा गावच्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी आंदोलन सुरु केले आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या टाकीवर बसून सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. तसेच, मराठा आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवर सुरु असलेले आंदोलन सुरूच असणार असल्याचं आंदोलनकर्ते यांनी म्हटले आहे. 


तब्बल 70 फुट उंच पाण्याचे टाकीवर साखळी उपोषण 


सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बीड तालुक्यातील मैंदा येथील मराठा समाजाच्या वतीने 70 फुट उंच पाण्याचे टाकीवर साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा येथील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनानंतर संपूर्ण राज्यासह मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात आंदोलनाचे लोन पसरले. अद्यापही हे आंदोलन प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर सुरूचं आहे. यामध्ये सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय आता मराठा समाज माघार घेणार नाही, असे चित्र निर्माण झालेले आहे. त्याच अनुषंगाने वडवणीपासून जवळ असणाऱ्या बीड तालुक्यातील मैंदा येथील मराठा समाजाच्या तरूण व नागरिकांच्या वतीने जिव धोक्यात घालून मैदा फाटा बीड परळी हायवे रोडवर असणारे 70 फुट उंच असणारे पाण्याचे टाकीवर साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange: अंतरवलीत आमच्यावर हल्ला का केला? मनोज जरांगेचा सवाल