नाशिक : अंतरवलीत आमच्यावर हल्ला का केला याचे उत्तर अजूनही सरकार देऊ शकले नाही, असा सवाल मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला केला आहे. पाच हजार पुरावे मिळालेत त्यामुळे आरक्षण (Maratha Reservation) द्यावेच लागेल, सरकार आपल्यात फूट पाडू शकते, ती पडू देऊ नका असे जरांगेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. रविवारी रात्री नाशिकच्या (Nashik News) सीबीएस परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित भाषणातून समाजबांधवांना करत पाच हजार पुरावे मिळाले आहेत त्यामुळे तुम्हाला आरक्षण द्यावेच लागेल, कसे देत नाही ते बघू असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा मनोज जरांगे यांनी केला.
मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. 29 ऑगस्टला लढाई सुरू झाली.संपूर्ण गावरक्त बंभाळ झाले होते . अनेक महिला आपल्याला आरक्षण नको पण माझ्या नातवाला काम येईल म्हणून तिथं होत्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. चार महिन्यांचे लेकरू असतांना आईचे डोकं फुटलं . त्या आईचे रक्त मुलाच्या अंगावर पडले होते, काहींचे हात मोडले, पाय मोडले, एका मुलीच्या पायात गोळी घुसली होती. एका मुलाच्या तर छातीत 35 गोळ्या शिरल्या होत्या.तो हल्ला आमच्यावर हल्ला नव्हता तर संपूर्ण मराठा समाजावर होता आमचं असं काय चुकलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला केला . शांततेत चाललेल्या आमच्या आंदोलनावर हल्ला का करण्यात आला? असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. छगन भुजबळांवर देखील नाव न घेता त्यांनी टीका करत मराठा आरक्षणाला विरोध नाही असं त्यांनी म्हणताच आम्ही विषय सोडून दिला पण आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मी सोडणार नाही तो कोणीही असो, मराठ्याची औलाद आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण मागितले ही आमची चूक होती का?
29 तारखेला जे आंदोलन होते त्याच्या आधी आम्ही इशारा दिला होता. मला खुर्चीचा मोह नव्हता, मी व्यासपीठावर गेलो नव्हतो. मी शांत बसा म्हटलो तरी लोक शांत बसत होते. जालन्याचे कलेक्टर आणि एसपी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हंटले असा मॉब शांत करणारा माणूस बघितला नाही असे म्हटले मग आम्ही नंतर कसा काय धिंगाणा केला? मराठ्यांची औलाद कधीच धिंगाणा करू शकत नाही पण सरकारने कधीच खुलासा केला नाही. आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या अशी मागणी केली तर चुकले काय ? आम्ही शांततेत आंदोलन केले ही आमची चूक होती का? 1923 पासून मराठा आरक्षण आहे हे मागितले ही आमची चूक होती का? असा सवाल मनोज जरांगेनी केला आहे.
जातीशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाज प्रचंड ताकदीने उतरला आहे. देशातील एकाही माणसात हे आंदोलन चिरडण्याची हिंमत नाही. चार दिवसांत आरक्षण देता येणार नाही असे सरकार म्हटले. कायदा टिकला नाहीतर काय करणार म्हणून 40 दिवसांचा वेळ मागितला म्हणून मी सांगितले 40 दिवस देतो. पाच हजार पुरावे त्यांना मिळाले आहे, त्यानुसार आता एकच पर्याय आरक्षण द्या. मी मरेपर्यंत हटणार नाही. हे पहिलं आणि शेवटचे आंदोलन आता मागे हटायचे नाही . सरकारला पलटी मारायची संधी नाही. जातीशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही. आमदार आणि मंत्र्यांनी खांद्यावर हात टाकला तरी दुसऱ्या दिवशी नीट सुद्धा बोलत नाही. पण माझ्यासमोर मंत्रिमंडळ बसले होते पण काहीच बदललो नाही. मला काही नको मी मरणाला भीत नाही. मला माझ्या समाजाच्या वेदना सहन होत नाही. -17 दिवस उपोषण केले,त्यानंतर डॉक्टर म्हटले आराम करा पण मी थांबलो नाही. वडिलांना सांगितले आलो तर चार मुलं नाहीतर तीनच मुलं त्यावर समाधान माना, रडायचे नाही. बायकोला सांगितले आलो तर ठीक नाहीतर कुंकू पुसून तयार राहायचे.
हे ही वाचा :