Beed: बीडच्या मस्साजोग प्रकरणाने राज्यात वातावरण तापलेले असताना आता परळीतील महादेव मुंडे (Mahadev Munde) या व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून होऊन 14 महिने उलटले तरी आरोपीला अटक झाली नाही. या हत्येचा तपासही झाला नसल्याची धक्कादायक बातमी आमदार सुरेश धस यांनी उघडकीस आणल्यानंतर आता बीड पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशानंतर  महादेव मुंडे यांनी अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सीडीआर (Call Detais Record) काढावेत, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.  (Beed News)


परळीमध्ये भर तहसील कार्यालयासमोर संध्याकाळी 7.30- 8 वाजेदरम्यान एक खून होतो. या घटनेला 14 महिने उलटतात तरीही खुनाचा उलगडा होत नाही. यादरम्यान चार तपास अधिकारी बदलतात, दोन एसपीची बदली होते. आपल्या पतीला न्याय मिळवा म्हूणन पत्नी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवते. पण आरोपी मिळत नाहीत.  या घटनेला आज दीड वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही महादेव यांचा खून कोणी केला आणि का केला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. बीडमध्ये पोलिस अधिकारीच आरोपींना पाठीशी घालतायत का? असा सवाल वारंवार उपस्थित होत असताना राजकीय दबावामुळे पोलिसांचा तपास ठप्प झाला असून परिस्थिती गंभीर असल्याचे आरोप सुरेश धस यांनीही केले होते. परळीतील पिग्मी एजंट असलेल्या महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं जात आहे.


नक्की प्रकरण काय?


परळी तालुक्यातील भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. 22 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयाजवळील प्रांगणात महादेव मुंडेंचा मृतदेह आढळला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 14 महिने उलटले तरी आरोपी फरारच आहे. या खून प्रकरणाचा तपासही झाला नसल्याचं आमदार सुरेश धस यांनी उघडकीस आणले होते. त्यांनंतर महादेव मुंडे यांच्या पत्नीने आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. महादेव मुंडे हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि प्रगतीला उशीर झाल्याचा आरोप होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची आ.सुरेश धस यांनी केली होती.मुंडे हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने तपास केला जाणार आहे.परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सीडीआर काढावेत,आम्हाला  न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.


हेही वाचा:


Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलावर काय आरोप?