Beed News: माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना प्रत्येकवेळी पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. तर पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी देऊन त्यांना मंत्रिपद देण्याची सुद्धा मागणी अनेकदा मुंडे समर्थकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद लाभावं अशी इच्छा बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या अंबाजोगाई येथे ‘सेवा पंधरवाडा' उपक्रमांतर्गत संवाद बुद्धिवंतांशी या कार्यक्रमात बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्यात की, पंकजा मुंडे पालकमंत्री असतांना आधीपेक्षा आणखी चांगल व्हावं यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झालेला आहे. अंबेजोगाई शहराला चारही बाजूने राष्ट्रीय महामार्ग जोडण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षात करण्यात आला. लवरकरच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे परत लाभाव्यात आणि जो काही विकासाचा गॅप  राहिला आहे तो भरून निघावा असे प्रीतम मुंडे म्हणाल्यात. तर पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा सुद्धा प्रीतम मुंडे यांनी यावेळी दिल्या आहे. 


तर मला मोदीही मला संपवू शकत नाही..


याच कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलतांना म्हणाल्या आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचा राजकारण संपवायचंय असून, मी सुद्धा वंशवादाचाप्रतिक आहे. पण मला कोणी संपवू शकत नाही, खुद्द नरेंद्र मोदी सुद्धा संपवू शकत नाही, कारण मी तुमच्या मनात आहे. जोपर्यंत मी तुमच्या मनात आहे तोपर्यंत मला कुणीही संपवू शकत नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात. त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. 


पंकजा मुंडेंनी संधी कधी मिळणार? 


विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना प्रत्येकवेळी पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे किमान आता राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यावर तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता खुद्द प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


ठाकरेंना मोठा धक्का;निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार; आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी; राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार, 4500 एसटी गाड्यांची मागणी