Beed News Update : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे तीन वर्षाचा मुलगा शाळेतून घरी येत असताना घराजवळील नाल्यात पडला. या नाल्यातून तो विद्रुपा नदी पात्रात वाहून गेलाय. ज्ञानेश्वर क्षीरसागर असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शहरातील रंगार चौक येथे घडली आहे. ज्ञानेश्वर वाहून गेलेला हा नाला गेवराई शहराजवळून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला (Vidrupa river) मिळतो. नाल्यात शोधाशोध करून देखील तो मिळाला नसल्याने विद्रुपा नदीवर मुलाचा शोध चालू आहे.  


ज्ञानेश्वर क्षीरसागर हा रंगार चौका मधील चिंतेश्वर गल्ली मध्ये राहतो. घरापासून काही अंतरावर अंगणवाडीची शाळा आहे. याच शाळेत तो शिकत होता. अंगणवाडीतून आणखी एका मुलासोबत तो घरी येत असतानाच रस्त्याच्या बाजूने वाहणारा नाला त्याला दिसला नसल्याने तो पाय घसरून नाल्यात पडला. 


ज्ञानेश्वर पाण्यात पडल्याचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. दुर्दैव म्हणजे ज्ञानेश्वर ज्यावेळी पाण्यामध्ये बुडाला त्यावेळी बाजूच्या रस्त्यावरून कुणीही जात नव्हतं. काही सेकंदामध्ये एक मोटरसायकल तेथून गेली. परंतु, त्या दुचाकीस्वाराला ज्ञानेश्वर या पाण्यात बुडाला याची कल्पना आली नसावी आणि त्यामुळे क्षणार्धात चिमुकला ज्ञानेश्वर पाण्यात वाहून गेला. नाल्यात पडल्यानंतर तो विद्रूपा नदीमध्ये गेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. 


हा नाला पुढे विद्रूप नदीला जाऊन मिळत असल्याने प्रशासनाच्या वतीने विद्रूपा नदी आणि पडलेल्या नाल्यामध्ये त्याचा शोध घेण्यात येत आहे. याच विदृपा नदीमध्ये गेवराई शहरांमधील सांडपाणी येऊन मिसळते. आधीच पावसाचे पाणी आणि त्यात गावातील सांडपाणी याच नदीत मिसळत असल्याने प्रशासनाला ज्ञानेश्वरचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय विद्रूपा नदीमध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. 


गेवराईत मुसळधार पाऊस


गेवराई शहरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील चिंतेश्वर गल्लीतील नाल्याला पाणी आले होते. दुपारी  ज्ञानेश्‍वर शाळेतून घरी येत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे नदी पात्रात त्याचा शोध गेत आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचीन खाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जवंजाळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या


हीटरच्या उकळत्या पाण्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना 


Dasara Melava : शिंदे-शिवसेनेत वाद सुरु असतानाच राज्यात आणखी एक 'दसरा मेळावा' होणार