Beed News: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असतांना आपला यासाठी खारीचा काय मुंगीचा देखील वाटा नसल्याचं विधान भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं सुद्धा पंकजा म्हणाल्यात. विशेष म्हणजे राज्यात आलेल्या नवीन सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरु असतानाच पंकजा मुंडे यांनी हे विधान केले आहे. 


शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असतांनाच आज मुंडे यांनी वेगळाच खुलासा केला आहे. सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते. त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर जे वंचित आहे त्या सर्वांसाठी मी लढणार आहे. नवीन सरकार त्रिमंडळामध्ये महिलांना स्थान देतील अशी अपेक्षा आहे. तर या संदर्भात माझी सक्त मागणी असल्याच पंकजा मुंडे म्हणाल्यात. 


माझा संघर्ष सुरूच राहणार...


पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात, मी मंत्री होते तेव्हाही संघर्ष केला. केवढ्या आरोपांना समोर गेले, किती संघर्षांना सामोरे गेले मी मंत्री असताना.  कधी एक दिवस सुखाचा तुम्ही बघितला आहे का?  संघर्ष हा माझा मुख्य स्वभाव आहे. कारण तो गोपीनाथ मुंडे यांनी मला वारसात दिला आहे. तर संघर्ष हा माझा कुठल्याही व्यक्ती विरोधात नसून तो प्रवृत्ती विरोधात असून, तो जारी राहणार आहे. मग मी मंत्री झाले काय आणि कोणीही झाले तरी संघर्ष सुरूच राहील असा देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं. 


परळीची एक चूक महागात पडली...


घुमून फिरून सर्वजण एकच म्हणतात 'परळी को संभालो,परळी को संभालो' आता काय करता. परळीची झाली एक चूक पण आपल्याला किती महागात पडली. माझी काही चूक झाली असेल, माझ्याकडून विकास कमी पडला असेल, कशानेतरी माझं चुकले असेल. प्रत्येकाला आपल्या छोट्याशा एका चुकीची लोकशाहीत मोठी किमंत मोजावी लागते. तुमच्या पायावर विकासाचा अभिषेक करावा म्हणून त्यासाठी वेळ दिला. पण आता माझ्याकडे वेळच-वेळ असल्याचं पंकजा म्हणाल्यात.


महत्वाच्या बातम्या...


राज्यात सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद? या नावाची चर्चा


Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीपदासाठी मराठवाड्याची उपेक्षा, दोनच जिल्ह्यांना मिळालं प्रतिनिधीत्व