Beed Crime News: बीडच्या (Beed) पिंपळनेर येथे एका महिलेसह पुरुषाने एकाचवेळी आत्महत्या (Suicide) केल्याने 26 जानेवारीला खळबळ उडाली होती. तर पोलिसांकडून याबाबत तपास सुरु असतानाच, त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. तर आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात बिनसले होते, यामुळे दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती पुढे आली आहे. मोहन बाबूराव नरवडे (वय 53 वर्षे), कौसाबाई भीमराव जाधव (वय 40 वर्षे, दोघे रा. पिंपळनेर) अशी मृतांची नावे आहेत. 


पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मृत कौसाबाईचे सासर गेवराई तालुक्यात असून माहेर बाभळवाडी (ता. बीड) आहे. दरम्यान त्या पाच वर्षापासून पिंपळनेरमध्ये राहत होत्या. 26 जानेवारीला सकाळी मोहन नरवडे यांनी स्वतःच्या शेतात गोठ्यामध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच गोठ्याजवळील विहिरीतच कौसाबाई जाधव यांचा देखील मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले होते. 


या घटनेनंतर मयत कौसाबाईच्या भावाच्या फिर्यादीवरून 27 जानेवारीला मृत मोहन नरवडेवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. तर कौसाबाईने मोहन नरवडेला 50  हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे कोसाबाई परत मागत होती. मात्र, मोहन पैसे न देता उलट तिला त्रास देत होता, असे कौसाबाईच्या यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. 


दोघांच्याही मुलांचे प्रेमाचे छत्र हरवले! 


आत्महत्या केलेल्या कौसाबाई यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तर मोहनला दोन मुले व एक मुलगी आहे. विवाहित असलेल्या या दोघांच्या प्रेमाचा शेवट वाईट झाला. कौसाबाईची मुले आईच्या तर मोहनची मुले वडिलांच्या प्रेमाला कायमची पारखी झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठं डोंगर कोसळले आहे.  दरम्यान, मोहन नरवडे यांच्या कुटुंबीयांची अद्याप पोलिसात तक्रार आलेली नाही. आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत काही नावे नमूद आहेत. शिवाय शर्टवरदेखील नामोल्लेख होता. मात्र कोणतेही तक्रार प्राप्त नसल्याने संबंधितांवर अद्याप गुन्हा नोंदविलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


Beed News: कोट्यवधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी बीडच्या वैद्यनाथ बँकेला पोलिसांची नोटीस


प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीच्या कोठडीत वाढ 


दारू पिऊन सतत मारहाण करून त्रास देणाऱ्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने काटा काढल्याची घटना 20 जानेवारीला बीड शहरातील पालवण चौक परिसरात उघडकीस आली होती. यातील प्रियकर व प्रेयसीच्या कोठडीत 28 जानेवारीला दोन दिवसांची वाढ झाली. कविता आजिनाथ इंगळे (वय 40 वर्षे, रा. हिवरसिंगा ह. मु. पालवण चौक, बीड), सतीश बेलू जाधव (वय 26 वर्षे, रा. जाधववाडी, ता. बीड, ह. मु. अंबिका चौक, बीड) अशी त्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. तर दत्तात्रय राधाकिसन इंगळे (वय 44 वर्षे, रा. हिवरसिंगा, ता. शिरुर, ह. मु., पालवण चौक, बीड) असे मृताचे नाव आहे.