Beed Police Officer Transfer : 'तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही', असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे असं बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.
गणेश मुंडे यांची पुणे नियंक्षण कक्षात बदली
गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या पोलीस अधिकाऱ्यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने त्यांना बीड जिल्ह्यातून हटवले असून त्यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणारी नाही, या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बीड पोलीसांचा एक अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनीही याबाबत भाष्य केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी या पोलीस अधिकाऱ्याचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करावेत, अशी मागणी केली होती.
गणेश मुंडेंना ग्रुपमधून काढले
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या गणेश मुंडेंनी अशा आशयाची पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरुन त्यांना काढून टाकण्यात आले होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधील पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, गणेश मुंडेंनी त्यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलिसांवर आरोप केले होते. सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील काही अधिकाऱ्याची मानवाधिकार आयोगाकडे केली होती. याशिवाय गणेश मुंडे आणि दहिफळे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Classical Language Status : मराठीच्या अभिजात भाषेची नुसतीच घोषणा, अधिकृत दर्जाचा शासन निर्णय कधी?