बीड : मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याच्या घटना सतत घडत असल्याचे समोर आले आहे. अनकेदा गुन्हा दाखल झाल्यावर देखील या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता बीड जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना समोर आली असून, बनावट लग्न लावून तरुणाची 3 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे बनावट लग्न लावणारं रॅकेट सक्रीय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर या प्रकरणी दोन एजंटसह महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लग्न लावून फसवणूक करणारी महिला आरोपी एका मुलीची आई आहे. 


बीडमध्ये बनावट लग्न लावणर एक मोठे रॅकेट सक्रिय झाला असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक येथील एका मुलीची आई असलेल्या महिलेने बीडच्या एका तरुणाशी लग्न करून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील धांडेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न होत नव्हते. त्यामुळे त्याने बीड मधीलच लग्न जमवणारे रामभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. कुलकर्णी यांनी कर्नाटक येथील बिदरच्या सुनिता नावाच्या महिलेशी तरुणाची भेट घालून दिली. त्यानंतर दिव्या नावाच्या मुली सोबत या तरुणाचं लग्न लावण्यात आलं होतं.


तरुणाला संशय आला अन्...


मात्र, लग्न लावण्यापूर्वी सुनीता हिने दिव्याच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये द्यावे लागतील अशी अट घातली होती. त्यानंतर या तरुणाने दोन लाख 80 हजार रुपये कुलकर्णी यांच्याकडे दिले होते. विवाहाच्या एक महिन्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात आली. मात्र, लग्नाला एक महिना होताच दिव्या हिने परत बिदरला जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तरुणाला संशय आला आणि हे सर्व एक रॅकेट असल्याचे त्याननंतर स्पष्ट झाले. या महिलेचे यापूर्वी देखील दोन लग्न झालेले असून, एका पतीपासून तिला मुलगी देखील असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी दोन एजंटसह या महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अशी केली जाते फसवणूक? 


मागील काही वर्षात बनावट लग्न लावून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहेत. राज्यातील अनेक भागात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यात बनावट लग्न लावणरं एक मोठे रॅकेट सक्रिय असून, संपूर्ण टोळी मिळून अशी फसवणूक करतात. अनेकदा यात मुलीचे आई-वडील देखील बोगस दाखवून लग्न लावण्यात येते. त्यानंतर बनावट नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन पसार होते. विशेष म्हणजे अनेकदा लग्न लावण्यासाठी मुलीच्या आई-वडीलांना काही पैसे द्यावे लागतील असे सांगून मुलाच्या कुटुंबीयांकडून पैसे देखील वसूल करण्यात येते. तर, बीड जिल्ह्यात यापूर्वी देखील असे प्रकार समोर आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विषारी औषध पाजले; बीड जिल्ह्यातील घटना