बीड : मध्यरात्री राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. अर्थात ही गुप्त भेट सकाळ होताच उघड झाली. ही भेट झाल्याची जरांगे पाटलांनी कबूलसुद्धा केले. मात्र धनंजय मुंडे यांनी मात्र अशी भेट झालीच नसल्याचे सांगितले. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंच्या या गुप्त भेटीनंतर बीडसह मराठवाड्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  


परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे धुमधडाक्यात आगमन झालं. रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत धनंजय मुंडे यांच्या या व्यासपीठावर 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना, क्रिती सेनन यांच्यासोबतच राज्यातील दिग्गज कलावंत सहभागी झाले होते. खरं तर हा कार्यक्रम जरी गणेश उत्सवाचा असला तरी धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्यावर टीका करणाऱ्याला या भाषणात झोडून काढले.


परळीच्या कार्यक्रमानंतर अंतरवालीकडे गाड्यांचा ताफा वळला


अर्थात हा सगळा कार्यक्रम सगळ्या समोरच फुलला होता. मात्र त्यानंतर रात्री 12 वाजताच धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाड्या अंतरवली सराटीकडे वळल्या. यावेळी कुणालाच माहीत नव्हते की आता मनोज जरांगे पाटलांना भेटायला जायचे आहे. दोन तासात धनंजय मुंडे अंतरवाली सराटीला पोहोचले. आंतरवालीच्या सरपंचाच्या घरी धनंजय मुंडे थांबले आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आले. यावेळी धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बरीच चर्चा झाली.


भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली


या भेटीमध्ये इतकी गुप्तता पाळण्यात आली होती ती या ठिकाणी कुणीही फोटो काढला नाही अथवा व्हिडिओ घेतला नाही. मात्र तिकडे दिवस उजाडला आणि या भेटीची चर्चा सुरू झाली. अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी ही भेट झाली असल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांनी अशी भेट झालीच नाही या मतावर ठाम आहेत. या भेटीचा टायमिंग सुद्धा विशेष आहे. कारण आजच मनोज जरांगे पाटील हे परळीमध्ये घोंगडी बैठक घेत आहेत आणि त्याच बैठकीच्या आधी या दोन नेत्यात गुप्त चर्चा झाली.


या आधीही दोन-तीन वेळा चर्चा 


खरंतर ही भेट होण्याआधीच जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये दोन ते तीन वेळा चर्चा झाली होती. अर्थात ही चर्चा होते मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे. धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटील हे फोन लावत होते. मात्र धनंजय मुंडे हेसुद्धा पीक नुकसानीचे पाहणी करत असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं होत नव्हतं. मात्र त्याच दिवशी धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चा झाली. ती चर्चा केवळ पीक नुकसानीची होती.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये सभांचा सपाटा लावला होता. त्यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचाराची मोहीम उघडल्याची चर्चा सुद्धा झाली. त्याचा परिणाम म्हणून पंकजा मुंडे यांचा पराभव सुद्धा झाला. 


विधानसभेतही मराठा वि. ओबीसी वाद?


आता विधानसभेचे उमेदवार हे धनंजय मुंडे असणार आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये पुन्हा बीड जिल्ह्यातील निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होईल अशी चर्चा आहे. त्याचा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि जरांगे पाटलांची भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीत आरक्षणावर चर्चा झाली असल्याचे जरी मनोज जरांगे सांगत असले तरी या भेटीचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर कसे होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


ही बातमी वाचा: