Beed crime update: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेच्या मित्रांनी वाल्मिक अण्णा आणि मुंडेंविरोधातील व्हिडिओ का बघतो म्हणून होमगार्ड अशोक मोहितेला (Ashok Mohite) जबर मारहाणीत गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्या डोक्याला खोल दुखापत झाली आहे . आठ टाके पडले आहेत .अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातून लातूरच्या खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे . अशोकवर उपचार सुरू असून अद्याप त्याला शुद्ध आली नसल्याचं त्याच्या वडिलांनी शंकर मोहिते यांनी सांगितलं . अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे .अशोकला मारहाण झाल्याचा समजलं तेव्हा मी रानात होतो .धारूरच्या दवाखान्यात त्याला नेले मात्र तिथे उपचार न झाल्याने पुढे लातूरला हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं . दरम्यान, जिथे मारहाण झाली तिथे फॉरेन्सिकसह पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. घटनास्थळी मोठा पुरावा सापडला असून डोक्यात लोखंडी तीक्ष्ण रॉड घालत मारहाण झाल्याचं उघड झालं आहे.
तपासाला वेग, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
दरम्यान , वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी लोखंडी रॉडने अशोक मोहितेच्या डोक्यात वार केल्याचं धारूर पोलिसांनी सांगितलं .दरम्यान केज तालुक्यातील तरनळी या ठिकाणी अशोक मोहितेला ही मारहाण करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांसह फॉरेनची टीम दाखल झाली आहे .वेल्डिंगच्या दुकानातलं हे सगळं साहित्य कर्मचारी ताब्यात घेत आहेत .धारूर पोलीस ठाण्यांतर्गत या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून फरार आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या आहेत . दरम्यान, मारहाण करताना तीक्ष्ण लोखंडी रॉड वापरल्याचं समोर आलं असून घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत.
अशोक मोहितेला अजूनही शुद्ध नाही,वडिलांनी सांगितले...
धारूरच्या तरनळी येथील अशोक मोहिते आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो असे म्हणत वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली.या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी असून त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, 'अशोकला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस मी रानात होतो .मला समजल्यावर मी लगेच तिथे पोहोचलो .धारूर येथील दवाखान्यात त्याला नेले .मात्र तिथे उपचार न झाल्याने पुढे त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर आता लातूरला उपचारासाठी हलवला आहे .आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत .अद्यापही त्याला शुद्ध नाही .अशोक मोहिते ला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा असं शंकर मोहिते यांनी एबीपी माझा'ला सांगितले .