Karuna Sharma Atrocity Case Cancelled : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे (Karuna Sharma-Munde) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. करुणा शर्मा यांच्यावर परळीत दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Case) औरंगाबाद खंडपीठाकडून (Aurangabad Bench) रद्द करण्यात आला आहे. सोबतच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेला 307 चा गुन्हा देखील न्यायालयाने रद्द केला आहे. परळीमध्ये आल्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या समोर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत ॲट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आला होता. या विरोधात करुणा शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. कोर्टाने याप्रकरणी दाखल केलेली सर्व प्रोसिडिंग रद्द करत गुन्हा रद्द करून प्रकरण निकाली काढले आहे. 


सप्टेंबर 2021 मध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत, आपण परळीत येणार असल्याचे व्हिडीओद्वारे घोषणा केली होती. त्यानुसार करुणा शर्मा यांनी 5 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या दौऱ्याला मुंडे समर्थकांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, परळीत दाखल झाल्यावर करुणा शर्मा यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या. मात्र, मंदिरात जाण्यापूर्वीच त्यांची गाडी अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात झाला. पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेले होते. यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तुल मिळून आल्याने पोलिसांनी शर्मा यांना ताब्यात घेतले होते. याचदरम्यान तत्कालीन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा घाडगे यांनी शहर ठाण्यात करुणा शर्मा व चालक अरुण दत्तात्रय मोरे यांच्याविरुध्द ॲट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. 


करुणा शर्मांना मोठा दिलासा...


परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पुढे त्यांच्यासह त्यांच्या चालकावर ॲट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा करत शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तसेच, याचिका दाखल करत खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने शर्मा यांना दिलासा दिला आहे. करुणा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा खंडपीठाने रद्द करण्याचे आदेश दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Dhananjay Munde : कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची आवश्यकता: धनंजय मुंडे