Beed : शेतात राबणाऱ्या बीडमधील महिलेसमोर वीज काळ बनून आली आहे. शेतात राबणाऱ्या आईवर लेक समोर असतानाच वीज कोसळली आहे. त्यानंतर आईचा जागीच मृत्यू झालाय. तर मुलगाही गंभीररित्या भाजलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडजी येथे ही घटना घडली. पंधरा वर्षीय मुलगा गभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


मन्यारवाडी येथील घटना 


बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे वीज पडून एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून यामध्ये पंधरा वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीना गणेश शिंदे असे या महिलेचे नाव आहे.


बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस 


अधिकची माहिती अशी की,  महिला आणि मुलगा दोघेजण शेतामध्ये काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्येच मीना शिंदे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या बाजूला असलेला ओंकार शिंदे हा पंधरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.


अवकाळी पावसाने थैमान


गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचा आणि फळबागांचे नुकसान झालंय. दुसरीकडे बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर पंधरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ravindra Waikar : एकनाथ शिंदे यांचा मोठा डाव, अमोल किर्तीकरांविरुद्ध ठाकरेंचा एकेकाळचा विश्वासू मैदानात उतरवणार, रवींद्र वायकरांना तिकीट?