Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील केज पोलिस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका कलाकेंद्रावर पोलिसांनी छापेमारी करत या कलाकेंद्राकरून 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजच्या कलाकेंद्रावर करण्यात आलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला आहे.    


केज पोलिस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका कलाकेंद्रावर शुक्रवारी अडीच वाजता पोलिसांनी छापा मारला. यावेळी कलाकेंद्रात वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली, महिला या पुरुषांसमोर नृत्य करताना मिळून आल्या. पोलिसांनी यावेळी केलेल्या चौकशीदरम्यान काही मुलींना विचारणा केल्यावर अनेकांकडे ओळखपत्रही नव्हते. तर यातील एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली. तसेच 16 पुरुषांनाही ताब्यात घेतले. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास केला जात आहे. 


दरम्यान बीडच्या केज पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या कलाकेंद्रावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. तसेच तिचे लैगिंक शोषण करून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहितीही तिने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पोलिसांनी कारवाई केलेल्या कलाकेंद्रात दारू, गुटखा, सिगारेटही आढळल्या. 


ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुखचं आरोपी 


बीडच्या केज पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांनी छापा टाकून चार अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. यावेळी एका अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.       


धाराशिवच्या डान्सबारवर कारवाई... 


धाराशिवच्या उमरगा शहरालगतच्या चौरस्त्यावरील एका डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला आहे. यावेळी अश्लील हावभावासह नृत्य करणाऱ्या 9 महिलांची सुटका करून त्यांच्यावर पैशांचे कूपन उधळणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात 58 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही परवानगी नसताना मोठ्या आवाजात गाणी लावून महिलांकडून अश्लील नृत्य करवून घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News: धक्कादायक! एचआयव्ही बाधित मुलं शाळेत शिकतायत म्हणून ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; बीडमधील घटना