Beed loksabha election Exit poll : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed loksabha election) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचे माहिती देण्यात आलीय. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार, बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) हे या सर्वेत पिछाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहेत.
टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार मविआ 25 महायुतीला 22 जागा मिळणार
टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार मविआ 25 महायुतीला 22 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्वण्यात आला आहे. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार काही ठिकाणचे निकाल हे धक्कादायक लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महायुतीला जरी फटका बसला असला तरी भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला 18 जागा मिळणार असल्याचं अंदाज आहे. तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला राज्यात 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे.
महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर
एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच
महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज
महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
भाजप 17 जागा
शिंदे गटाला 6 जागा
अजित पवार गट 1 जागा
महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
शिवसेना ठाकरे गट 9 जागा
काँग्रेस 8 जागा
शरद पवार गटाला 6 जागा
महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य
शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरणार
बीड लोकसभा मतादरसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील बड्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
ABP Cvoter Exit Poll : महाविकास आघाडीत 'ठाकरे'च बॉस, पवार-काँग्रेसचाही मोठा फायदा, कुणाला किती जागा मिळणाार?