Beed Firing : बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील येथील बँक कॉलनीत ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी असल्याचे माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचं निधन झालं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
परळीत गोळीबार, एक ठार आणि दोन जखमी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परळीतील येथील बँक कॉलनीत परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबल माजली आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्याच्या जवळील परळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजित पवार गटातील धनंजय मुंडे समर्थकाचा मृत्यू झाला आहे.
धनंजय मुंडे समर्थक सरपंच बापूराव आंधळे जागीच ठार
या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, हा गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
बबन गीते यांचा सहकारी महादेव गीतेही जखमी
या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांनाही गोळी लागली त्यांच्यावर अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबार प्रकरणांमध्ये एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
परळी शहरांमध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मृत झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत.
हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला अथवा कोणी कुणावर गोळी झाडली हे अद्याप समजू शकले नाही ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले मात्र अद्याप घटना कशामुळे घडली आणि कुणी घडवली हे पुढे येऊ शकलेलं नाही.