Beed Farmers News : शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून (Farmers Bank Account) परस्पर पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार बीड (Beed) जिल्ह्यात समोर आला आहे. बीड जिल्ह्यातल्या चौसाळा (Chousala) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत (Beed District Central Bank Branch) ही घटना घडली आहे. पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरची रक्कम परस्पर उचलण्यात आल्याचं समोर आलं आहे. पैसे उचलणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बीडच्या पोलीस अधीक्षकांडे (Superintendent of police) केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान झाले होते जमा
बीड जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या (District Central Co-Op. Bank Ltd, Beed) चौसाळा शाखेत हा प्रकार घडला आहे. बीड तालुक्यातील गोलंग्री (Golangri) येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळू दगडु पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यावर महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत 50 हजार रूपये जमा झाले होते. या सर्व शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेजही आले होते. परंतू या शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिनं उचलल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी बँकेत विचारणा केल्यावर मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची कसून चौकशी करा, दोषींवर गुन्हे दाखल करा
जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेमध्ये अनागोंदी कारभार असून याबद्दल शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अशा प्रकारचा अपहार अनेक गावांमध्ये घडला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान याप्रकरणी कसून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीडच्या गोलंगरी गावातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे कर्ज मिळालं होतं. मात्र हीच कर्जाची रक्कम शेतकऱ्यांनी आपल्या खात्यातून काढण्याअगोदरच अज्ञाताने परस्पर ती काढून घेतली. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याप्रकरणी परस्पर पैसे उचलणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: