Beed Crime News: राज्यभर बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात झालेल्या खुलाशांनी आणि समोर आलेल्या धक्कादायक माहितीने संपूर्ण राज्य हादरले आहे. बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर (Beed) मोठा प्रश्न निर्माण झाला असून बीडमधील वाढतं पिस्तूल प्रकरण, दिवसाढवळ्यावर होणऱ्या हत्या, अपहरणाचे बनाव (Fake Kidnapping) आणि राजकीय वक्तव्यांमधून खुलासे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पायाला साखळदंड लावत थेट पोलीस अधिक्षकाच्या कार्यालयात अपहरणाचा बनाव रचल्याचं सांगत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बदनामी केल्याप्रकरणी बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


अपहरणाचा बनाव करून मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे या व्यक्ती विरोधात भाजपाचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी इंगळे पायाला साखर दंड बांधलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा रंगली होती.


पैसे लुटण्यासाठी अपहरणाचा बनाव


व्यवसायातील भागीदाराने अपहरण करून जवळील पैसे लुटण्याचा बनाव ज्ञानेश्वर इंगळे याने केला होता. यादरम्यान पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बाबत वक्तव्य करीत त्यांची बदनामी करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्या. यावरूनच हा गुन्हा दाखल झाला आहे.दत्ता तांदळे आणि ज्ञानेश्वर इंगळे हे व्यावसायिक भागीदार आहेत. व्यवसाय वाढीसाठी वीस लाख रुपयांचे पत्र पंकजा मुंडे यांच्याकडून आणण्यासाठी दहा टक्क्याने दोन लाख रुपये द्यायचे आहेत.असे सांगून हे मुंबईला निघाले होते. याच दरम्यान इंगळे याने अपहरणाचा बनाव केला होता.


भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल


या प्रकरणावरून भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी तक्रार दाखल केली, ज्यावरून इंगळे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. बनावट अपहरण, खोटी माहिती पसरवणे, आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतर्गत इंगळेवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 


हेही वाचा:


Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!


Manoj Jarange: मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाके संतापले, म्हणाले, 'तुमच्यात दम असेल तर...'