बीड : बीडमध्ये (Beed) शनिवार 13 जानेवारी रोजी ओबीसी महाएल्गार (OBC Sabha) सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) उपस्थित राहतील. पण बीडमधील या महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवलाय. तसेच भुजबळांना जर बीडच्या सभेला यायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन यावं, अशी मागणी देखील करण्यात आलीये. ओबीसीतूनच मराठा आरक्षणाच्या हवं या भूमिकेवर मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहेत, तर ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही,अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात येत आहे. 


ओबीसी मेळाव्यास विरोध नाही मात्र छगन भुजबळ यांनी संविधानिक पदावरती घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग करत असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. तसेच मराठ समजाच्या विरोधात त्यांची भूमिका असून त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली. त्यामुळे जर बीडच्या सभेला यायचं असेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने त्यांच्या सभेला मराठा आंदोलन विरोध करणार असल्याचं यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. 


प्रशसनाने देखील परवानगी नाकारावी


एकीकडे मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या सभेला विरोध होत आहे. तसेच दुसरीकडे प्रशासनाने देखील या आंदोलकांना परवानगी नाकारावी अशी मागणी देखील या आंदोलकांनी केलीये. त्यामुळे उद्या बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मराठा आंदोलक विरोध करत असून आता या सभेचं स्वरुप कसं असणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे छगन भुजबळ या सभेत काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


मुंबईतील आंदोलनावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार


20 जानेवारी रोजी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. दरम्यान आता मराठा आंदोलानाची हाक मुंबईतून दिली जाईल. पण या  आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 


हेही वाचा : 


खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास