बीड: सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनावेळी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याविषयी मुस्लीम समाजात संतप्त पडसाद उमटत असतानाच आता महंत रामगिरी महाराजांवर पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील बीड (Beed), गेवराई आणि आष्टी पोलीस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 


वादग्रस्त वक्तव्यामुळे महंत रामगिरी महाराज आणि विरोधात तीव्र पडसाद उमटले होते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील बीड शहर गेवराई आणि आष्टी पोलीस ठाण्यात महंत रामगिरी यांच्याव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहातील प्रचारादरम्यान मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहे. त्यामुळे बीडमध्ये देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले होते. महंतांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. आणि याच अनुषंगाने एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर गेवराईत सय्यद हुसेने यांनी महंत रामगिरी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. आष्टी पोलीस ठाण्यात नाजीम शेख यांनी भावना दुखावल्याची तक्रार दिली होती.


मुंबईतही महंत रामगिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल


बीड पाठोपाठ महंत रामगिरी महाराज यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत झालेली आहे. मुंबईच्या पायधुनी पोलिस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी हेतूपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होतील, असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  पायधुनी पोलिस ठाण्यात महंत रामगिरी महाराजांविरोधात कलम 196(1),(अ), 299,302,3 52,353(2), 353(3),356, भा.न्या.संहिता 2023  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. पोलीस आता महंत रामगिरी यांच्यावर अटकेची कारवाई करणार, हे पाहावे लागेल.


महंत रामगिरी म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला


या सगळ्या वादानंतर महंत रामगिरी यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी मुस्लीम समाज आणि मोहम्मद पैगंबरांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे त्यांनी सांगितले. मी तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या दीड तासांच्या प्रवचनातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे महंत रामगिरी यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा


'महंत रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मी देखील जातो, पण...'; वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?