Beed Lok Sabha Constituency : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर जाहीर सभेतून धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonwane) यांच्यावर जोरदार टीका केली होती. 


विरोधी उमेदवार बहुरंगी आहे. बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे. आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाच्या (Maratha Community) पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो. समोरचा उमेदवार मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र ते सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार? असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. 


बहीण भावाला पराजयाची घाई झालीय 


या टीकेला बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी उत्तर दिले आहे. दोन्ही बहीण भावाला पराजयाची घाई झाली आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावं. धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना अहंकार झाला असून राज्यातील सर्व पक्ष मीच चालवतो असं त्यांना वाटत आहे. आम्ही कोणत्याही निवडणुकीत (Election 2024) कधी जात आणली नाही.  तेच जातीचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला आहे.


मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी देव


तर पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी मी देखील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जिल्हा परिषदेत ठराव घेतला होता, असं सांगितलं. मात्र हे सगळं खोटं असल्याचं सांगत बजरंग सोनवणे यांनी 2007 मध्ये बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा जो ठराव झाला होता. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही नाही आणि त्यांची या ठरावावर सही देखील नाही, असे त्यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजासाठी देव आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Beed Lok sabha Election: मुलाचे सरप्राईज, भावाची साथ, कुटुंबाची सोबत; पंकजा मुंडेंनी बीडमधून भरला लोकसभेसाठी अर्ज


Bajrang Sonwane answer to Journalist : पत्रकाराचा इंग्रजीत प्रश्न, बजरंग सोनवणेंचं खतरनाक उत्तर (Video)