Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आहेत .या दोन महिन्यांमध्ये मी देशाचे गृहमंत्री अमित शहांकडे ( Amit Shah) पहिल्यांदा या प्रकरणाच्या तपासा संदर्भातली मागणी केली .त्यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन तपासाला वेग आला .या प्रकरणात कृष्णा आंधळे (krushna Andhale) हा आरोपी अद्याप फरार आहे .या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी पोलीस पकडत नाहीत का ? असा सवाल खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavne )यांनी उपस्थित केलाय .तसेच एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणत्या पोलिसांवर कोणती कारवाई केली हे अद्याप आम्हाला कळत नाही .केज पोलीस अधिकारी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी का केले जात नाहीत? असा सवालही त्यांनी केला .

Continues below advertisement


केज पोलीस अधिकारी सहआरोपी का करत नाहीत?


ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी मी समाधानी होईल असं खासदार बजरंग सोनवणे म्हणालेत .गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही पुरावे नष्ट करण्याचे हे प्रशासनाचेच षडयंत्र असल्याचा आरोप करत आहेत .हत्या होऊन आता दोन महिने लोटले आहेत .यात केज पोलीस अधिकारी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहा आरोपी का केले जात नाहीत असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केलाय .


काय म्हणाले बजरंग सोनवणे ?


ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी मी समाधानी होईल.संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आहेत या दोन महिन्यांमध्ये मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पहिल्यांदा या प्रकरणाचा तपास करण्याच्या संदर्भातली मागणी केली आणि त्यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन तपासाला वेग आला.त्यानंतर मानव अधिकार आयोग असेल अथवा पोलीस चौकशी संदर्भातली मागणी वेळोवेळी लावून धरली ज्यामुळे यातील आरोपीवर कडक कारवाई होत आहे.मात्र, आणखी ही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी हा आरोपी पोलीस पकडत नाहीत का असा प्रश्न मला पडतो आहे.


एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सुद्धा बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणत्या पोलिसावर कोणती कारवाई केली हे अद्याप आम्हाला कळत नाही.केज पोलीस अधिकारी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सह आरोपी का केले जात नाहीयेत.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी कृष्णा आंधळे ला मोकळे सोडले आहे का असा सवाल सुद्धा यावेळी बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा:


संतोष देशमुखांच्या हत्येला 60 दिवस उलटले, कृष्णा आंधळे फरार, तपास कुठपर्यंत आला? प्रत्येक दिवसाची अपडेट पाहा