Beed Crime News : बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या (Beed Crime News) केलीय. हि घटना गेवराई (Georai) तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Continues below advertisement

दोघांचाही दुसरा विवा, आईने चिमुकलीसह स्वत:ला संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता यांचे तीन वर्षांपूर्वी मालेगाव येथील बळीराम यांच्याशी विवाह झाला. मात्र सतत पती-पत्नीत होणाऱ्या वादामुळे त्या त्रस्त होत्या. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्येच पाऊल उचल आपलं जीवन संपवलं. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या वादात मात्र एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बळीराम आणि अंकिता या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. दरम्यान या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून काही घातपात आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

चड्डी बनियन गँगची दहशत, एका रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या

जळगावच्या भडगाव तालुक्यातील कजगावात चड्डी बनियन गँगने एका रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या घटनेमुळे गावात घबराट पसरली असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगावात मध्यरात्री स्वामी समर्थ परिसर, शंकर नगर आणि स्टेशन रोड परिसरात या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. स्वामी समर्थ परिसरातील यशवंत उत्तम मोरे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी कपाट फोडले आणि त्यातून 15 ते 20 हजारांचा ऐवज लांबविला. सागर दाभाडे यांचे बंद घर तसेच अजयसिंग पाटील यांचे घर फोडले, मात्र काही हाती लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी स्टेशन रोडवरील वर्धमान चोरडिया यांच्या घरात प्रवेशाचा प्रयत्न केला, पण पावसामुळे दरवाजे फुगल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून चड्डी बनियान गँगचे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

Continues below advertisement

ही बातमी वाचा: