Avatar 2 Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तरीही 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन आता 40 दिवस पूर्ण झाले असून आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.
जगभरात 'अवतार 2'ची क्रेझ कायम!
मीडिया रिपोर्टनुसार, 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचा आता जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत समावेश झाला आहे. 'अवतार 2'ने (Avatar 2) हॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. यात 'स्टार वॉर्स एपिसोड 7 - द फोर्स अवेकेन्स' (Star Wars: The Force Awakens) सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा समावेश आहे.
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.075 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. 'स्टार वॉर्स द फोर्स अवेकेन्स' या सिनेमाने 2.064 कोटींचा टप्पा पार केला होता. आता 'अवतार 2'ने या सिनेमाला मागे टाकलं आहे. 'अवतार'च्या (Avatar) पहिल्या भागाने 2.92 बिलियन डॉलरचा गल्ला जमवला होता. तर 'अॅव्हेंजर्स एंडगेम' (Avengers: Endgame) या सिनेमाने 2.79 बिलियन डॉलरची कमाई केली होती. दुसरीकडे 'टायटॅनिक' (Titanic) या बहुचर्चित सिनेमाने 2.19 बिलियन डॉलरची कमाई केली होती.
जेम्स कॅमेरॉन सुपरहिट!
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) केलं आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार', 'अवतार 2' आणि 'टायटॅनिक' असे तीन सिनेमे जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. 'अवतार 2' या सिनेमाने फक्त भारतात तब्बल 390 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'अवतार 2' येणार ओटीटीवर!
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. लवकरच या सिनेमाचे आणखी भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'अवतार 2' लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
संबंधित बातम्या