Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी यशस्वी जीवनासाठी त्यांच्या नीतीशास्त्रात (Chanakya Niti) काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी चाणक्यांनी अशाच काही खास कामांचा उल्लेख केला आहे. काही महत्वाच्या गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्यास व्यक्ती स्वतः आणि त्याचे कुटुंब नेहमी आनंदी राहतात. यासोबतच समाजाचेही कल्याण होते. जाणून घ्या अशी कोणती कामे आहेत? ज्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबावर दु:खाची छाया फिरू शकत नाही. (Chanakya Niti In Marathi)



नात्रोदक समं दानं न तिथि द्वादशी समा।


न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।



गायत्री मंत्र
शास्त्र, सनातन धर्म आणि चाणक्य यांनी गायत्री मंत्राला सर्व मंत्रांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि अधिक प्रभावी मानले आहे. या मंत्रासारखा दुसरा मंत्र जगात नाही, कारण ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वेद आणि सामवेद या चारही वेदांची उत्पत्ती देवी गायत्रीने केली आहे. असं धर्मशास्त्रात म्हटलंय. या वेदांमध्ये यशस्वी जीवनाचे सूत्र स्पष्ट केले आहे. देवी गायत्रीच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्य प्रत्येक संकटातून मुक्त होतो. कठीण काळात गायत्री मंत्राच्या जपाने प्रत्येक समस्या दूर होतात.


 


इतरांची सेवा


चाणक्य म्हणतात की, इतरांची सेवा माणसाला असा आनंद देते जे त्याला पैसा किंवा इतर गोष्टी मिळाल्यावरही कधीच आनंद वाटत नाही. आता उन्हाळा येणार आहे वातावरणातील गारवा हळूहळू कमी होतोय. याच उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांना, पशू-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने माणसाला परम सुखाची प्राप्ती होते. त्याच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात.


 


द्वादशी तिथी


चाणक्याने आपल्या श्लोकात द्वादशी तिथीला जीवनात खूप महत्त्व दिले आहे. चाणक्य आणि त्यांच्या शास्त्रात म्हटलंय की, द्वादशी तिथी सर्व तिथींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. भगवान विष्णूची आराधना करून द्वादशी तिथीचे व्रत केल्यास मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.


 


धर्म आणि दान


आचार्य चाणक्यांनुसार, ज्या व्यक्तीमध्ये दान करण्याची भावना असते, त्यांच्या जीवनात येणारे सर्व संकट टळतात आणि कुटुंब नेहमी सुखी राहते. विशेष म्हणजे निःस्वार्थपणे दान करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम सात पिढ्यांपर्यंत असतो. यासाठी लोकांनी वेळोवेळी अन्न, पैसा आणि कपडे दान केले पाहिजे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti :'ही' लोक यशात आणतात अडथळे, वाईट काळातही त्यांच्याकडे कधीच मदत मागू नका