Upcoming Yamaha Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटरच्या जगात आणखी एक जबरदस्त एंट्री होणार आहे. यामाहा एका नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर (Yahama Neo) काम करत आहे. जी लवकरच लॉन्च केली जाईल. कंपनीने एप्रिल महिन्यात डीलर्स मीटिंगमध्ये त्यांच्या दोन नवीन स्कूटर निओ आणि E01 प्रदर्शित केल्या होत्या. त्याचबरोबर कंपनी भारतीय बाजारात निओ लाँच करण्याची तयारी करत आहे.
निओ स्कूटर लॉन्च करण्याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण प्रसिद्ध झालेल्या काही ताज्या रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. ही स्कूटर व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांसह सादर केली जाईल. दुसरीकडे Yamaha Neo च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर युरोपियन बाजारात याची किंमत 2.58 लाख रुपये आहे.
बॅटरी
यामाहा निओ आधीच युरोपियन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 50.4 V, 19.2 Ah Li-ion असे दोन रिमूव्हेबल बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. ही बॅटरी 2.5 किलोवॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. याच्या रेंजबद्दल बोलायचे तर, ही स्कूटर एका चार्जवर 70 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.
लूक आणि फीचर्स
यामाहा निओच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, याला स्लिक लूक देण्यात आला आहे. ही स्कूटर फीचर्सच्या बाबतीतही चांगली आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह या स्कूटरमध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्ट की इंटिग्रेशन, एलईडी लाइटिंग सिस्टिम पाहायला मिळणार आहे. याशिवाय 27-लिटर अंडरसीट स्टोरेज देखील यामध्ये उपलब्ध असेल. यामाहा निओला स्टँडर्ड टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक देखील मिळणार.
Yamaha E01 E-Scooter
Yahama E01 इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले तरी ही स्कूटर निओपेक्षा जास्त पॉवरफुल असेल. यामाहाचा दावा आहे की E01 इलेक्ट्रिक एका चार्जवर 100 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. यात तीन रायडिंग मोड उपलब्ध आहेत. याची टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास आहे. यामाहा E01 ई-स्कूटरमध्ये ड्युअल चॅनल एबीएस, ड्युअल रीअर सस्पेंशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि बेल्ट ड्राईव्ह सिस्टीम सारखी फीचर्स मिळतील.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI