Xiaomi Electric Vehicle: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्पीकर आणि एअर प्युरिफायर यांसारख्या उत्पादनांनंतर चीनची दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Xiaomi आता ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, Xiaomi ऑगस्टमध्ये आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचा प्रोटोटाइप उघड करू शकते. कंपनीच्या या इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन 2024 मध्ये सुरू होणार असल्याचेही वृत्त आहे.


Xiaomi मार्च 2021 पासून त्याच्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पावर काम करत आहे. Xiaomi या प्रकल्पात 1.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कंपनीची पुढील 10 वर्षात 10 बिलियन डॉलर्स गुंतवण्याची योजना आहे. Xiaomi ला ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी चीन सरकारकडून आवश्यक परवानगी देखील मिळाली आहे. कंपनीने या नवीन प्रकल्पासंदर्भात एक टीझरही जारी केला होता. ज्यामध्ये वाहनाच्या टायरचे चिन्ह प्रतीकात्मकपणे दाखवले आहेत. Xiaomi आपली उपकंपनी Xiaomi Auto Co Ltd च्या माध्यमातून या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणार आहे.


Xiaomi इलेक्ट्रिक कारसाठी एक उत्पादन प्लांट देखील तयार करत आहे. या उत्पादन केंद्रात दरवर्षी सुमारे 3 लाख इलेक्ट्रिक वाहने बनवता येतील, असा कंपनीचा दावा आहे. Xiaomi ची पहिली इलेक्ट्रिक कार शांघाय HVST ऑटोमोबाईल इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड द्वारे डिझाइन केली जात आहे.


Xiaomi ने आधीच लॉन्च केली आहे  इलेक्ट्रिक सायकल 


Xiaomi ने आधीच एका कार्यक्रमात आपली इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ज्याला QiCycle असे नाव देण्यात आले आहे. ही सायकल 2999 युआन (अंदाजे 30,699 रुपये) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कार्बन फायबरपासून बनवलेल्या या सायकलमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. याशिवाय पेडलिंगमध्ये रायडरला मदत करण्यासाठी 250W 36V मोटर बसवण्यात आली आहे. फुल चार्ज झाल्यावर ही सायकल 45 किमीची रेंज देते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI