Citroen C3 Prices in India: Citroen ने आपली नवीन कार Citroen C3 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही छोटी एसयूव्ही 5.71 लाख रुपये किंमतीत लॉन्च केली आहे. Citron C3 Liv आणि Feel या दोन प्रकारात लॉन्च करण्यात आले आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे. कंपनी 19 शहरांमध्ये डीलरशिपद्वारे याची विक्री करत आहे. तसेच आजपासूनच या कारची डिलिव्हरी सुरू झाली आहे. Citroen C3 ची च्या किंमतीत नंतर कंपनी वाढ ही करू शकते. ही कार 90 टक्के भारतातच तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या तिरुवल्लूर, तमिळनाडू येथील प्लांटमध्ये याचे उत्पादन सुरु आहे.
Citroen C3 किंमत
1.2 पेट्रोल लाईव्ह: 5.71 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील: 6.62 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील वाइब पॅक: 6.77 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन: 6.77 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन वाइब पॅक: 6.92 लाख रुपये
1.2 पेट्रोल टर्बो फील ड्युअल टोन वाइब पॅक: 8.05 लाख रुपये
याची बुकिंग 1 जुलैपासून सुरू करण्यात आली होती. Citroen C3 ला कंपनीने तीन पॅकसह आणले आहे. ज्यामध्ये 56 कस्टमायझेशन पर्याय दिले जातील. यात 70 अॅक्सेसरीजची निवड आहे. कंपनीने 2 ड्युअल टोन कलर पर्यायांसह 10 रंग पर्यायात ही कर लॉन्च केली आहे.
Citroen C3 मध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 82 hp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 19.8 kmpl चे मायलेज देते. यात 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 110 एचपी पॉवर आणि 190 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI