Ellysium Automotives च्या मालकीच्या Eveium या EV ब्रँडने भारतात तीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत. कंपनीने या स्कूटर Cosmo, Comet आणि Czar च्या नावाने लॉन्च केल्या आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, यांची किंमत अनुक्रमे 1.44 लाख रुपये, 1.92 लाख रुपये आणि 2.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ई-स्कूटर्सचे बुकिंग Eveium डीलरशिपवर 999 रुपयांच्या रकमेसह केली जाऊ शकते. कॉस्मो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे तर, यात 2000 डब्ल्यू मोटर वापरण्यात आली आहे. जी स्कूटरला 65 किमी प्रतितास आणि 80 किमीची रेंज गाठण्यास मदत करते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही 4 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटर ब्राइट ब्लॅक, चेरी रेड, लेमन यलो, व्हाइट, ब्लू आणि ग्रे या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त Eveium Comet बद्दल सांगायचे तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3000 W ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. यात 50Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ज्यामुळे या स्कूटरला 85 kmph चा टॉप स्पीड मिळतो. या बॅटरी पॅकमुळे या इलेक्ट्रिक स्कूटरला 150 किमीची रेंज मिळते. ही स्कूटर 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कंपनीने इव्हियम कॉमेट इलेक्ट्रिक स्कूटर एकूण सहा रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये शायनी ब्लॅक, मॅट ब्लॅक, वाईन रेड, रॉयल ब्लू, बेज आणि व्हाइट यांचा समावेश आहे.
कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर Eveium Czar मध्ये 42Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. जो 4000 डब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतो. ही मोटर इतर दोन स्कूटरपेक्षा सर्वात पॉवरफुल मोटर आहे. याच वेग ताशी 85 किमी आहे. याची रेंज 150 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. त्याच्या कलर पर्यायांबद्दल सांगायचे तर, कंपनीने याला एकूण सहा रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे. ज्यात ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक, ग्लॉसी रेड, लाइट ब्लू, मिंट ग्रीन आणि व्हाईट कलर यांचा समावेश आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI