Ambassador Car 1972 Price: एकेकाळी अॅम्बेसेडर कारची जादू अशी होती की, देशभरातील प्रत्येकाला ती खरेदी करायची किंवा चालवायची होती. लोक त्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून बघायचे. विशेषतः राजकारण आणि चित्रपट जगतातील लोकांनी ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. ही कार 70 आणि 80 च्या दशकातील अनेक चित्रपटांचाही भाग आहे. हिंदुस्थान मोटर्सने ही कार 1957 मध्ये भारतात सादर केली होती. 1980 च्या दशकापर्यंत लोकांना ही कार खूप आवडली, त्यानंतर मारुती सुझुकीने भारतात प्रवेश केला. पुढे अॅम्बेसेडरची विक्री कमी होऊ लागली आणि शेवटी कंपनीला 2014 मध्ये याचे उत्पादन थांबवावे लागले. मात्र ही गाडी आजही अधूनमधून रस्त्यांवर दिसते आणि ती पाहून लोक जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात.


Ambassador Car 1972 Price: किती होती या कारची किंमत? 


सध्या 1972 मॉडेलची कार असलेल्या अॅम्बेसेडर कारची किंमत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिंद्र अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत 25 जानेवारी 1972 ची बातमी दिसत असून ती 50 वर्षांपूर्वीची आहे. ज्यात "गाड्यांच्या किमती वाढल्या" नावाच्या बातमीचा मथळा दिसत आहे. संपूर्ण बातमी वाचल्यानंतर कळते की, 1972 मध्ये या कारच्या किमतीत 127 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर या कारची नवीन किंमत 16,946 रुपये झाली होती. ही बातमी वाचून खुद्द आनंद महिंद्राही चकित झाले आहेत.






Ambassador Car 1972 Price: आनंद महिंद्रा काय म्हणाले..


फोटो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, यामुळे मी जुन्या आठवणींमध्ये रमलो आहे. मग मी बसने जेजे कॉलेजला जायचो. माझी आई अधूनमधून मला तिची निळी फियाट कार चालवायला देत असे. मला तेव्हा माहित नव्हते की, कारची किंमत इतकी आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर एका युजर्सने कमेंट केली की त्यांच्या वडिलांनी 1972 मध्ये 18,000 रुपये ऑन रोड किमतीत अॅम्बेसेडर कार खरेदी केली होती. तसेच अनेक युजर्सनी या वाहनाची किंमत जास्त असल्याचे सांगितले. आणखी एका युजरने म्हटले आहे की, आता गाडीचे फक्त दोन टायर 15,000 रुपयांना मिळतात. त्या दिवसांत 15,000 रुपये किमतीचे सोने घेतले असते तर आज त्याची किंमत असलेली कार खरेदी करता आली असती.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI