Maruti Alto K10 Xtra Edition: मारुती सुझुकीची अल्टो (Maruti Suzuki Alto) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार सादर झाल्यापासून 43 लाखांहून अधिक लोकांची आवडती बनली आहे. गेल्या वर्षी कंपनीने या कारचे नवीन जनरेशन मॉडेल Alto K10 लॉन्च केले होते, जे लोकांना खूप आवडते. आता कंपनीने या कारचा एक नवीन प्रकार Alto K10 Xtra Edition सादर केला आहे. नवीन एडिशनचा लूक आणि इंटीरियर हे नेहमीच्या मॉडेलपेक्षा थोडे वेगळे आहेत. नवीन कारला ORVM वर नारिंगी हायलाइट्ससह स्किड प्लेट्स आणि रूफ माउंटेड स्पॉयलर मिळतात. याच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. यात तेच 1.0-लिटर, के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.


Maruti Alto K10 Xtra Edition: डिझाइन


नवीन मारुती सुझुकी अल्टो K10 Xtra एडिशनला बॉडी-रंगीत डोअर हँडल, नारिंगी हायलाइट्ससह ब्लॅक-आउट स्किड प्लेट्स, डिझायनर कव्हर्ससह स्टील व्हील्स, नारिंगी ORVM, मस्क्यूलर बोनेट, हॅलोजन हेडलॅम्प, हेक्सागोनल हनीकॉम्ब-ग्रील आणि बंपर-लॅम्प्स मिळते. याच्या उर्वरित डिझाइन स्टँडर्ड मॉडेल प्रमाणेच आहे.


Maruti Alto K10 Xtra Edition: इंजिन 


मारुती अल्टो K10 च्या एक्स्ट्रा एडिशनला रेग्युलर मॉडेल प्रमाणेच 1.0-लीटर K10C पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हे इंजिन 67hp आणि 89Nm आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे.


Maruti Alto K10 Xtra Edition: फीचर्स 


या कारच्या आतील भागात मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, मिनिमलिस्ट डॅशबोर्ड डिझाइन, 7.0-इंच स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-टोन फॅब्रिक अपहोल्स्ट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, ड्युअल एअरबॅग्ज आणि मॅन्युअल एसी आहेत.


Maruti Alto K10 Xtra Edition: किती आहे किंमत? 


मारुती सुझुकीने अल्टो 10 एक्सट्रा एडिशनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. याची किंमत लॉन्चच्या वेळी घोषित केली जाईल. याचे नियमित मॉडेल 3.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. परंतु त्याची किंमत थोडी जास्त असू शकते.


या कारशी होणार स्पर्धा 


ही कार Hyundai च्या Grand i10 NIOS शी टक्कर देईल, ज्यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. त्याची किंमत थोडी जास्त असली तरी त्यात सुविधाही जास्त आहेत.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Tata Cars Price Hike: टाटा पुन्हा वाढवणार आपल्या वाहनांची किंमत, जाणून घ्या कोणत्या कारवर किती झाली दरवाढ


Car loan Information:

Calculate Car Loan EMI