Karnataka Government Decision : जेव्हा आपली कार (Car) खराब होते किंवा त्यावर धूळ साचते अशा वेळी आपण अनेकदा कार स्वच्छ धुतो. यामुळे गाडीही चांगली नव्यासारखी दिसते. पण तुम्हाला माहित आहे का असं एक राज्य आहे जिथे स्वच्छ पाण्याने गाडी धुतल्यास चक्क तुम्हाला 5000 रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. तर, हे राज्य नेमकं कोणंत आहे? आणि या राज्यात सरकारने असा नियम का लागू केला? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 


खरंतर, हा निर्णय कर्नाटक राज्य सरकारचा आहे. कर्नाटक सरकारच्या नव्या नियमांनुसार स्वच्छ पाण्याने कार धुतल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. स्वच्छ पाण्याने गाड्या धुण्यास कर्नाटक पाणीपुरवठा आणि सीवर बोर्डने बंदी घातली आहे. याशिवाय बागकाम, दुरुस्तीचे काम, वॉटर फाऊंटन, रस्ते बांधणी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामात शुद्ध पाण्याच्या वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.


कर्नाटकात पाणीटंचाई


बेंगळुरू आणि त्याच्या जवळपासच्या शहरांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. या शहराला 3500 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ 219 टँकरची नोंदणी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या टँकरची नोंदणी 7 मार्चपूर्वी करावी, असा सल्लाही राज्य सरकारने जारी केला होता. याशिवाय कर्नाटक सरकारनेही या टँकर मालकांना पाण्याच्या टँकरची किंमत ठरवून देण्याचा इशारा दिला आहे. तसेच पाण्याचे टँकर मालकांनी खरेदीदाराकडून जास्तीचे पैसे घेऊ नयेत असंही सांगण्यता आलं आहे. 


सरकारने पाण्याचे दर जाहीर केले


बेंगळुरू शहर प्राधिकरणाने पाण्याच्या टँकरची किंमत जाहीर केली आहे. शहरातील पाच किलोमीटरच्या परिघात 6000 लिटरच्या पाण्याच्या टँकरची किंमत 600 रुपये आहे. तर 8000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 700 रुपये आणि 12000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.


5-10 किलोमीटरच्या परिघात 6000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 650 रुपये होते. 8000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 850 रुपये आणि 12000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 1200 रुपये झाली आहे. तरी, पाण्याची टंचाई पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Hyundai Car Offer : मार्च महिन्यात Hyundai च्या गाड्यांवर मिळतेय बंपर ऑफर, तब्बल 43 हजार रुपयांपर्यंतची करा बचत; कारची लिस्ट पाहाच


Car loan Information:

Calculate Car Loan EMI