Different Types Of Number Plate : आपल्यापैकी अनेकांनी कारमधून (Car) प्रवास केला आहे. रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला रस्त्यांवर अनेक प्रकारच्या चारचाकी गाड्या आपण पाहतो. या गाड्या पाहताना त्यांचा ब्रॅंड, कारचा रंग आणि एक गोष्ट आपल्याला आकर्षित करते ती म्हणजे कारची नंबर प्लेट. आपल्या सर्वांना माहीत आहे की, प्रत्येक गाडीची नंबर प्लेट ही वेगळी असते. काही नंबर प्लेट या देशानुसार वेगळ्या असतात तर काही प्रोफेशननुसार वेगळ्या असतात. अशाच काही कारविषयी आणि त्यांच्या नंबर प्लेटविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 


वेगवेगळ्या कारच्या नंबर प्लेट्सचा रंग 


पिवळा रंग (Yellow Colour) : आपण अनेकदा निळी, लाल, पिवळी किंवा काळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार पाहतो. यामध्ये काही कार कमर्शियल व्हेहिकल असतात. म्हणजेच, व्यावसायिक कामासाठी या कारचा वापर केला जातो. या कारचा नंबर प्लेट पिवळ्या रंगाचा असतो. या कार व्यवसयाच्या दृष्टीने टाकला जातो.  


लाल रंग आणि त्यावर भारताचा अशोक स्तंभ (Red Colour with India's Emblem) : या रंगाची नंबर प्लेट ही जे मोठमोठे मंत्री जसे की राष्ट्रपती असतात त्यांच्या गाड्यांना असतात. ही फार खासगी वाहनं असतात.  


लाल रंग (Red Colour) : लाल रंगाच्या या नंबर प्लेट टेम्परोरी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असतात. यांचा वापर काही महिन्यांसाठी केला जातो.    


निळा रंग (Blue Colour) : निळ्या कार या फॉरेन कार असतात. embassy मधल्या ज्या गाड्या असतात. त्या embassy ची जी लोकं वापरतात त्यांच्यासाठी ब्लू नंबर प्लेट असते. 


काळा रंग (Black Colour) : काळ्या रंगाच्या कार या भाडेतत्त्वावर असणाऱ्या कार असतात. 


पांढरा रंग (White Colour) : पांढऱ्या रंगाच्या कार या सामान्य भारतीय नागरिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात. भारतात आपल्याला या कार ठिकठिकाणी दिसतात. 


हिरवा रंग (Green Colour) : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट असणाऱ्या कार या इलेक्ट्रिक वाहनावर आधारित असतात. अर्थात या गाड्यांना पेट्रोलची गरज नाही लागत. त्यामुळे इंधनाची बचतही होते. 


नंबर प्लेट आणि वरच्या दिशेने अॅरो असणाऱ्या कार (Number Plate With an Upward Arrow) : या कारची नंबर प्लेट असणाऱ्या कार या मिलिटरीच्या वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात. याचा वापर सामान्य नागरिकांना करता येत नाही.   


महत्त्वाच्या बातम्या :


Hyundai Car Offer : मार्च महिन्यात Hyundai च्या गाड्यांवर मिळतेय बंपर ऑफर, तब्बल 43 हजार रुपयांपर्यंतची करा बचत; कारची लिस्ट पाहाच


Car loan Information:

Calculate Car Loan EMI